म्हाडाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By Admin | Updated: September 26, 2014 00:23 IST2014-09-24T23:07:58+5:302014-09-26T00:23:18+5:30

म्हाडाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

MHADA officer in the ACB trap | म्हाडाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

म्हाडाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नाशिक : म्हाडाकडून खरेदी केलेल्या घरावर वडिलांच्या नावाची हस्तांतराची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच घेणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास महामंडळाचे उपसमाज विकास अधिकारी दिनकर आनंदा वानखेडे यांना बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़
खरेदी केलेल्या घराच्या हस्तांतराची वडिलांच्या नावाची नोंद घेण्यासाठी तक्रारदाराने म्हाडाकडे अर्ज केला होता़ या अर्जावरून सदनिका हस्तांतराची नोंद घेण्यासाठी म्हाडाचे दिनकर वानखेडे यांच्याकडे गेले असता त्यांनी एक हजार रुपयांची मागणी केली़
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सापळा लावण्यात आला़ त्यानुसार दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून हजार रुपयांची रक्कम वानखेडे यांनी घेताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले़ वानखेडेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: MHADA officer in the ACB trap