शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच विजय यांच्या अडचणी वाढल्या! मित्रपक्ष नाराज, पहिल्याच दिवशी सरकारमध्ये अंतर्गत संघर्ष
2
Mamata Banerjee: टीएमसीच्या जखमेवर मीठ! पराभवानंतर काँग्रेस आणि डाव्यांनीही ममता बॅनर्जींकडे फिरवली पाठ
3
Marathi News LIVE: PM मोदींच्या आवाहनामुळे काळजी वाढली, नेमके कशाचे संकेत?, तर्कवितर्क सुरू
4
अनैतिक संबंधासाठी पतीला संपवण्याचा पत्नीचा खळबळजनक कट; विजेचा करंट देऊन मारण्याचा प्रयत्न फसला
5
Jeetu Munda : १९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब फळफळलं; मिळाले १५ लाख
6
ठाण्यातील वागळे इस्टेटमध्ये दिसला बिबट्या; एका व्यक्तीने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला व्हिडीओ
7
इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
8
"प्रेम हे कायम..." थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णनची पहिली पोस्ट; चाहते म्हणतात...
9
"तुमच्या अटी मान्य नाहीत!" इराणच्या उत्तराने ट्रम्प भडकले; होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव
10
दोन हजार 'ड्रोन'ने उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट; मुंबईकरांना अक्षरशः भारावून टाकले
11
सोन्यावर पंतप्रधानांचं वक्तव्य, बाजार उघडताच 'टाटा'चा 'हा' शेअर धडाम; रेखा झुनझुनवालांना १७०० कोटींचा झटका
12
चर्चमध्ये जाते, मंदिरातही नमस्कार करते, तृषा कृष्णन नेमकं कोणत्या धर्माचं पालन करते? जाणून घ्या
13
'निवडणूक संपताच संकट आठवलं का?'; पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अखिलेश यादव यांची टीका
14
'सौरभ' बनून मुलींना जाळ्यात ओढायचा शोएब; मोबाईलमुळे ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतराचा खेळ उघड
15
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
16
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
17
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
18
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
19
Trisha Krishnan: तृषा कृष्णनने लग्न का केलं नाही? बिजनेसमॅनसोबत झालेला साखरपुडा, लग्नही ठरलेलं, पण...
20
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाच्या निवडीचे वेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:26 IST

विधानसभा निवडणुका संपताच आता महापौरपदाचे वेध लागले असून, त्यासाठी लवकरच मुंबईत सोडत निघणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुका संपताच आता महापौरपदाचे वेध लागले असून, त्यासाठी लवकरच मुंबईत सोडत निघणार आहे. त्यामुळे या सोडतीकडे नगरसेवकांचे लक्ष लागून आहे. अर्थात आरक्षण कोणतेही निघो, परंतु सत्तांतरासाठी विरोधकांपेक्षा शिवसेनेचा आटापिटा सुरू असून त्यामुळे यंदा सत्ता समीकरणे बदलतील काय याकडे पालिका वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधीच महापौरपदाची निवडणूक होणार होती. मात्र महापौरांना तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. आता विधानसभा निवडणुका संपताच आरक्षणासाठी सोडत होणार असून, त्यानंतर खऱ्या अर्थाने हालचाली गतिमान होतील.
२०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाला १२२ पैकी ६६ जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला स्वतंत्रपणे ३५ जागांवर विजय मिळाला होता. भाजपाकडे पूर्ण बहुमत असल्याने त्यांना कोणत्याही पक्षाची गरज भासली नव्हती. मात्र आता विधानसभा निवडणुकीपासूनच राजकारण बदलू लागले असून, शिवसेनेच्या वतीने भाजपाला अडचणीत आणण्याचे घाटत आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्याने आता सत्तेच्या रस्सीखेचला जोरदार सुरुवात आहे. त्याचे पडसाददेखील उमटत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाला सत्तेवरून खेचण्यासाठी शिवसेनेने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीपासूनच मोर्चेबांधणी करतानाच महापालिकेत सत्तांतरासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांना मधाचे बोट लावले होते. त्यानुरून सानप हे आधी राष्ट्रवादी आणि नंतर शिवसेनेत दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुका आता पाच वर्षांनीच होतील त्यामुळे इतका दीर्घकाळ सत्तेशिवाय राहण्याची सानप यांचीदेखील मानसिकता नाही. त्यामुळे हीच संधी साधून
शिवसेनेने सानप यांना गळाला लावल्याचे बोलले जाते. तीस वर्षे भाजपात राहून अनेक पदे इतकेच नव्हे तर शहराध्यक्षपद
भूषविणाºया सानप यांच्यामार्फत महापालिकेतील भाजपाच्या सत्तेला सुरुंग लावण्याच्या हालचाली सुरू आहेत.
आता या सर्व हालचाली छुप्या पध्दतीने सुरू असल्या तरी सोडतीनंतर खºया अर्थाने त्यास वेग येणार आहे. आधी सर्वांचे लक्ष सोडतीकडे लागले असून, कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघते त्यावर पुढील खेळी असणार आहे.
भाजपची तटबंदी पालकमंत्री करणार
मनपात सत्तांतर करण्यास शिवसेना आतुर असून, भाजपा नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू झाली असली तरी भाजपाची सूत्रे पालकमंत्री गिरीश महाजन हेच करणार असून त्यामुळे ते कशी तटबंदी करणार याकडे लक्ष लागून आहे. आता या सर्व हालचाली छुप्या पध्दतीने सुरू असल्या तरी सोडतीनंतर त्यास वेग येणार आहे. सर्वांचे लक्ष सोडतीकडे लागले असून, कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघते त्यावर पुढील खेळी असणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाElectionनिवडणूक