शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लाल कांद्याच्याही बाजारभावाला लाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 17:28 IST

उन्हाळ कांद्याची आवक मंदावली : आयातीमुळे परिणामांची भीती

ठळक मुद्देदोन्ही कांदे एकाच वेळी बाजारात दाखल झाल्यास कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील

लासलगाव : लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक बंद झाली असून मंगळवारी (दि.३) २५१ वाहनातील २६७४ क्विंटल लाल कांदा किमान २५०० ते कमाल ८९०१ रूपये आणि सरासरी ७१०० रूपये दराने विक्री झाला. केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशांतून १७ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला असला तरी उन्हाळ कांद्या पाठोपाठ लाल कांद्याच्या बाजार भावालाही लाली चढली आहे. लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याच्या बाजार भावाने आठ हजाराचा टप्पा पार करत उच्चांक केला.देशांतर्गत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने केंद्र सरकारने इजिप्त आणि तुर्की या दोन देशातून १७ हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा कांदा डिसेंबरच्या शेवटी तसेच जानेवारीच्या सुरु वातीस देशांतर्गत दाखल होणार आहे. त्यादरम्यान लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात देशांतर्गत आवक होणार असल्याने दोन्ही कांदे एकाच वेळी बाजारात दाखल झाल्यास कांद्याचे बाजार भाव मोठ्या प्रमाणात कोसळतील. परिणामी त्याचा फटका भारतीय कांदा उत्पादकांना बसण्याची भीती या क्षेत्रातील तज्ज्ञ व बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा