शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्त बाजारपेठ सज्ज

By admin | Updated: October 22, 2016 00:14 IST

खरेदीला उत्साह : बहुविध पर्यायांमुळे ग्राहकांना निवडीची संधी

सिन्नर : आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या स्वागतासाठी बाजारपेठा सज्ज झाल्या असून, आकाशकंदील, स्टिकर्स, लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या लक्ष्मी (केरसुणी), खत्यावण्या, बोळके, उटणे, करदोडे, रांगोळ्या, रंग, पणत्या यांची रेलचेल दिसून येत असून, या प्रत्येक गोष्टींमध्ये पर्याय उपलब्ध होत असल्याने ग्राहकांना निवडीची पुरेपूर संधी मिळत आहे. सायंकाळची गर्दी टाळण्यासाठी अनेकजण दुपारच्या वेळी शांततेत खरेदी करून घेत असल्याचे चित्रही दिसून येत आहे. लहानसहान वस्तूंपासून मोठ्या वस्तूंपर्यंत खरेदीची यादी बनविली जात असून, शक्यतो एकाचवेळी सर्व खरेदी आटोपण्यावरही भर दिला जात आहे. आकाशकंदिलांमध्ये कापडी, कागदी, क्राफ्ट पेपर, प्लॅस्टिक, वेताचे, लाकडी, क्रोशाचे असे असंख्य पर्याय असून, चायनामेड आकाश कंदिलांऐवजी भारतीय बनावटीच्या आकाशकंदिलांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. दोन पैसे जास्त मोजून टिकाऊ व पुढील वर्षीही वापरता येईल असे आकाशकंदील घेण्यावर यंदा अनेकांचा भर दिसत आहे. आकाशकंदील १५० ते १००० रुपयांपर्यंत मिळत असून, रंगसंगती व आकार यात असंख्य पर्याय असल्याने ग्राहक समाधानी दिसत आहेत. याशिवाय घराबाहेर गॅलरीत, खिडकीत तसेच आॅफिस, दुकान आदि ठिकाणी लावण्यासाठीचे छोटे आकाश कंदीलही बाजारात दाखल झाले आहेत. यंदा त्यात रंगसंगती, डिझाइन, आकार यात खूप प्रयोग केलेले दिसून येत आहे. हे आकाशकंदील ४० ते ६० रुपये डझन या दरात उपलब्ध आहेत. लक्ष्मीपूजनाच्या केरसुण्या (लक्ष्मी) गणेशपेठ, सरस्वतीपूल सर्वच बाजारपेठांमध्ये विक्रीस आल्या असून, छोटी केरसुणी दहा रुपये, तर मोठी ३० ते ४० या दरात मिळत आहे. उटण्यांच्या दरात यंदा किंचित वाढ झाली असून, २० रुपयांपासून पॅकिंगमध्ये उटणे विक्रीस उपलब्ध आहे. भाऊबीजेसाठी लागणारे करदोडेही बाजारात दाखल झाले असून, ७ ते १५ रुपयांपर्यंत काळे व लाल रंगांमध्ये ते उपलब्ध आहेत. (वार्ताहर)