शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
3
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
4
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
5
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
6
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
7
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
8
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
9
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
10
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
11
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
12
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
13
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
14
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
15
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
16
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
17
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
18
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
19
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
20
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई

वाड्या-वस्त्या ओस, मजुरांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 4:41 PM

दुष्काळजन्य स्थिती : रोजगाराच्या शोधार्थ कुटुंबीयांची धावपळ

ठळक मुद्देरब्बी हंगामातील पिकांची लागवड करता येणार नसल्याने रोजगारही उपलब्ध होणार नाही .

खामखेडा : चालू वर्षी अल्पशा पावसामुळे दुष्काळज्यन परिस्थिती निर्माण झाल्याने रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होत असून त्यामुळे ठिकठिकाणी वाडी-वस्ती ओस पडू लागल्या आहेत.चालू वर्षी देवळा तालुक्यात अल्पशा पावसामुळे आतापासून भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पुढे कामे राहणार नाहीत म्हणून या वर्षी मोठ्या प्रमाणात आदिवासी मजुरांचे स्थलांतर होताना दिसून येत आहेत. परिसरात यापूर्वी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते असे. त्यामुळे गावातील मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध होत असे. परंतु या वर्षी अगदी अल्पशा पावसामुळे नदी-नाल्याना पुराचे पाणी आले नाही .त्यामुळे धरणे व नाला बांध भरले नाहीत. परिणामी, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्यामुळे विहिरींना पाणी नाही. रब्बी हंगामातील पिकांची लागवड करता येणार नसल्याने रोजगारही उपलब्ध होणार नाही . खामखेडा परिसरातून दर वर्षी काही प्रमाणात आदिवासी लोक थोडया प्रमाणात ऊस तोडणीसाठी बाहेरील राज्यातील कारखान्याकडे जात असतात. त्यात काही लोक अहमदनगर, पुणे, बारामती, कोल्हापूर ,सातारा, जिल्ह्यासह गुजरात,व मध्यप्रदेश प्रांतात जातात. आता दुष्काळी स्थितीमुळे संसारासाठी लागण्याऱ्या वस्तू घेऊन बैलगाडयांसह ट्रकद्वारे मजुरांचे स्थलांतर होताना दिसून येत आहे. सकाळ सायंकाळी फुलून दिसणाºया गावातील आदिवासी वस्ती वाड्यावर आता मात्र वयोवृद्ध व लहान मुलेच दिसून येत असल्याने वाडी,वस्त्या ओस पडत चालल्या आहेत.

टॅग्स :Nashikनाशिकdroughtदुष्काळ