मालेगावी १९४ मि.मी. पावसाची नोंद

By Admin | Updated: July 29, 2014 00:52 IST2014-07-28T23:53:39+5:302014-07-29T00:52:00+5:30

शेतकामांना वेग : पावसाने २०० जनावरे दगावली; घरांची पडझड

Malegaavi 194 mm Rain sign | मालेगावी १९४ मि.मी. पावसाची नोंद

मालेगावी १९४ मि.मी. पावसाची नोंद

मालेगाव : तालुका व परिसरात बुधवारी पडलेल्या संततधारेमुळे तालुक्यात आतापर्यंत १९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
या भीज पावसामुळे खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या असून, शेतीच्या मशागतीला वेग आला आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये थांबलेली पेरणीची कामं नव्या जोमाने सुरू झाली आहेत. यामुळे शेतकरी उल्हसित झाला असला तरी या यात दाभाडीत राजाराम पवार यांच्या मालकीचा एक रेडा व पाच पारड्यांचा तसेच मोहपाडा, निमशेवडी, डोंगराळे, भारदेनगर, सावतावाडी, हिसवाळ, वळवाडे आदि गावांमध्ये या पावसामुळे पशुधनाचा मृत्यू झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या भीज पावसामुळे तालुक्यातील हिसवाळ, झाडीसह काही गावांमध्ये घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. तहसीलदारांच्या आदेशाने तलाठ्यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.
जानेवारी महिन्यापासून शेतकऱ्यांवर अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ या संकटांचा आघात
झाल्यावर पशुधन दगावल्याने शेती व्यवसायावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. (वार्ताहर)

Web Title: Malegaavi 194 mm Rain sign