शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : महायुतीच्या बंडखोरांवरील कारवाईकडे उमेदवारांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 04:20 IST

दोन्ही पक्षांकडून अद्यापही या बंडखोरांना थंड करण्याचे अथवा त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने या बंडखोरांना पक्षांतर्गत फूस असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षाच्या विरोधात भाजप व सेनेच्या बंडखोरांनी उघडउघड स्वत:चा प्रचार चालविल्याने महायुतीच्या उमेदवारांपुढे आव्हान उभे ठाकले आहे. दोन्ही पक्षांकडून अद्यापही या बंडखोरांना थंड करण्याचे अथवा त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने या बंडखोरांना पक्षांतर्गत फूस असल्याचा संशय व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे या बंडखोरांसमवेत पक्षाचे पदाधिकारीही उघडपणे प्रचारात सहभागी होत असल्याने त्याचा मनस्ताप पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला होत आहे.नाशिक जिल्ह्यातील पंधरा मतदारसंघांत युती व आघाडीच्या जागावाटप सन २००९ च्या निवडणुकीप्रमाणे झाले असून, शिवसेनेने विद्यमान आमदारांना उमेदवारी कायम ठेवली तर भाजपने नाशिक पूर्व मतदारसंघातील उमेदवारी वगळता अन्य तिघा आमदारांना रिंगणात उतरविले आहे.नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनेक इच्छुक असतानाही ही जागा भाजपला सुटल्यामुळे सेनेचे इच्छुक नाराज झाले. त्यातील नगरसेवक विलास श्ािंदे यांनी अपक्ष उमेदवारी करून भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्यापुढे अडचण निर्माण केली आहे. शिंदे यांच्या माघारीसाठी पक्षाकडून प्रयत्न केले गेले तरी, त्याला शिंदे यांनी दाद दिली नसल्याचे सांगण्यात आले. शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन सेनेच्या २२ नगरसेवकांनी केले असून, त्यांच्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी सर्व नगरसेवकांनी हजेरी लावून शिंदे यांच्या पाठीशी असल्याचे उघडउघड दाखवून दिले आहे.मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू असताना सेनेच्या नगरसेवकांनी तिकडे पाठ फिरवून शिंदे यांच्या प्रचाराचा नारळ वाढविल्याची बाब भाजपत अस्वस्थता निर्माण झाली आहे. असाच प्रकार नांदगाव मतदारसंघात झाला असून, नांदगावची जागा सेनेच्या वाट्याची आहे हे माहिती असूनही भाजपच्या जिल्हा परिषदेच्या सभापती मनीषा पवार यांनी गेल्या काही महिन्यांपासून नांदगाव मतदारसंघात कामाला लागल्या होत्या. मात्र जागा सेनेला सुटल्याचे पाहूनही त्यांनी व पती रत्नाकर पवार या दोघांनीही नामांकन दाखल केले.माघारीच्या दिवशी मनीषा पवार यांनी माघार घेतली असली तरी रत्नाकर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवून बंडखोरी केली आहे. खुद्द मनीषा पवार यांनी आपला अर्ज मागे घेताना पक्षाबरोबर राहणार असल्याचे सांगितले आहे. मात्र शिवसेनेविषयी त्यांची नाराजी स्पष्टपणे समोर आली आहे.तिकीट कटले तरी मैदानातआघाडीने २००९ च्या उमेदवारांना कायम ठेवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या काही महिन्यांपासून तयारीत असलेल्या इच्छुकांचा उमेदवारी न मिळाल्याने हिरमोड झाला. त्यातील काहींनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेतली तर काहींनी बंडाचे अस्त्र उगारले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNashikनाशिक