शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

पक्षप्रमुखाला दोषी ठरविणे चुकीचे

By admin | Updated: February 11, 2015 23:37 IST

मुख्यमंत्री : भाजपाच्या दिल्लीतील पराभवामुळे आनंद झालेल्या विरोधकांवर टीका

नाशिक : भारतीय जनता पक्षाने केंद्राबरोबरच राज्यांतील निवडणुकांमध्ये यश मिळविले; मात्र दिल्लीत पक्षाला अपयश आले म्हणून पक्षप्रमुखाला दोषी ठरविणे चुकीचे आहे़ तसेच या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या विरोधकांनी हे लक्षात ठेवावे की, दुसऱ्याच्या घरातील मुलाचा आनंद फार काळ साजरा करता येत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली़ महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत सोहळ्यानंतर आयोजित पत्रकार पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत, तर भारतीय जनता पक्षाला केवळ तीन जागा मिळाल्या़ यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबरोबरच अनेक पक्षांनी मोदी लाट कमी झाल्याची वक्तव्ये केली होती़ याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, अनेक राज्यांमध्ये आम्ही जिंकलो अन् एका राज्यामध्ये हरलो़ जिंकलो त्याचा आनंद साजरा केला, तर हरलो त्याबाबत आत्मपरीक्षण करू़ त्यामुळे विरोधकांनी अशाप्रकारे मूल्यमापन करणे चुकीचे आहे़एखाद्या ग्रामपंचायत, नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष हरला म्हणजे पक्ष प्रमुखाला कसे दोषी धरणार? भाजपाच्या या पराभवाबाबत विरोधी पक्षांकडून आनंद व्यक्त केला जात आहे़ या पराभवाबाबत आम्ही आत्मचिंतन करणार आहोत़ तसेच पराभवाकडून विजयाकडे जाण्याचा पक्षाचा इतिहास असून, जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा मिळवू, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला़ जीवनातील चांगल्या-वाईट अशा दोन्ही वेळा जो सोबत राहतो तो सहकारी असतो़ जीवनात जेव्हा मागे येण्याची वेळ येते, त्यावेळी सहकाऱ्याने सोबत राहण्याची आवश्यकता असते़ असा टोला लगावून दिल्ली पराभवानंतर टीका करणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे सहकाऱ्याची भूमिका समजावून सांगितली़दिल्लीतील निवडणुकीनंतर शिवसेनेने केलेल्या टीकेबाबत अप्रत्यक्षपणे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यावेळी आपण सहकारी म्हणून भूमिका पार पाडीत असतो, त्यावेळी सहकाऱ्याने चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही वेळेस सोबत राहायचे असते़ जीवनात कधी-कधी अशा प्रकारची वेळ येते की, थोडे मागे यावे लागते, त्यावेळी जो आपल्यासोबत असतो तो सहकारी़ अशा प्रसंगी सहकाऱ्याने आपल्यासोबत असावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.