शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

बोटावरची शाई, तिकिटासाठी घाई

By admin | Updated: October 16, 2014 18:59 IST

बोटावरची शाई, तिकिटासाठी घाई

 

नाशिक : कुणी एकटे तर कुणी जोडीने महाकवी कालिदास कलामंदिरातील तिकीट खिडकीवर बोटावरील शाई दाखवत होते आणि ‘छापा-काटा’ या नाटकाचे सवलतीत तिकीट मिळवित आपले आसन आरक्षित करत होते. फ्रेंड्स सर्कलने राबविलेल्या मतदारजागृती विशेष अभियानाला नाट्यरसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आपले नाट्यप्रेमही व्यक्त केले. मतदारजागृतीसाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू असताना, नाट्य व्यवसायात असलेल्या फ्रेंड्स सर्कलनेही मतदारांना मतदानास प्रवृत्त करण्यासाठी नाटकाचे सवलतीत तिकीट देण्याची योजना राबविली. फें्रड्स सर्कलने मुक्ता बर्वे निर्मित व अभिनित ‘छापा-काटा’ या नाटकाचा प्रयोग येत्या रविवारी महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित केला आहे. मतमोजणीच्या दिवशी होणाऱ्या या नाटकाचा आस्वाद घेण्यासाठी फें्रड्स सर्कलचे संचालक जयप्रकाश जातेगावकर यांनी सवलतीत तिकीट देण्याची योजना आखली; परंतु त्यासाठी मतदानाचा आग्रह धरला. जो मतदान केल्याचा पुरावा म्हणून बोटावरची शाई दाखवेल त्याला तिकिटात तब्बल शंभर रुपयांची सवलत त्यांनी बहाल केली. एक हजार आसनक्षमतेच्या कालिदास कलामंदिरात आपले आसन आरक्षित करण्यासाठी नाट्यरसिकांनी मतदान करताच कालिदासकडे धाव घेतली आणि तिकिटाची सवलत प्राप्त केली. या योजनेला दिवसभरात चांगला प्रतिसाद लाभल्याचे जातेगावकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)