शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कांदा चाळ बनविवण्यासाठी मिळेना साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 00:24 IST

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.

ठळक मुद्देशेतातील कांद्दाची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता

निऱ्हाळे : शासनाने लावलेल्या जनता कर्फ्युमुळे, लॉकडाऊन आदी विविध प्रकारच्या निर्णयामुळे दुकाने बंद झाल्याने शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी साहित्य सामुग्री मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच पडून असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. अशातच रणरणत्या उन्हामुळे व अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा शेतात तर कुठे झाडाखाली पडुन असुन तो साठवण्याची पंचाईत झाली आहे. उन्हामुळे या कांद्याची टिकवण क्षमता घटण्याची शक्यता असल्याने कांदा पीक घेऊनही शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे कांदा चाळ बनविण्यासाठी लागणारी सामग्री मिळवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ सुरू आहे.कडक लॉकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांना कांदा चाळ बनविवण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. अशा परिस्थितीत हि करोना महामारी समाप्त होईल, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.कांदा लागवडीच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा बियाणे वाया गेल्याने जे रोप जगली त्यात कांदा लागवड करण्यात आली. पिकलेल्या कांद्याला भाव कमी असल्याने तसेच सध्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कांदा साठवणूक करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे.कांदाचाळ बनविण्याचे काम अनेक शेतकरी आपल्या शेतात करत आहेत. मात्र ऐन उन्हाळ् कांदा काढणीच्या हंगामात झालेल्या लॉकडाउन मुळे, कांदा चाळ बनविवण्यासाठी लागणारी ॲगल, पट्टी,जाळी, पत्रे, विटा सिमेंट यासारखी साधनसामग्री सध्या मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा कांदा कडक उन्हात पडुन आहे.उन्हाने कांदा लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे कांदा जास्त दिवस टिकणार नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन मोठा तोटा सहन करावा लागेल काही शेतकरी मात्र शेतातच झाडाच्या सावलीत कांद्याची पोळ मारुन ठेवताना दिसत आहेत.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी...... प्रत्येकाला कांदा चाळ...... पण.. तीही ऑनलाईन अर्ज भरून.... शेतकरी कसा अर्ज भरणार..... मग ह्या चाळी शेतकऱ्यांना मिळणार कधी... कृषि अधिकारीच काय पण कृषी सहाय्यक पण शेतकरी वर्गाला भेटत नाही. म्हणे लॉगडाऊन आहे. आता बियाणे मोफत देणार.. पण अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा पण शेतु कार्यालयही बंद मग बियाणे कसे मिळेल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गाने केली आहे.(१२ निऱ्हाळे, १)चाळीविना झाडाच्या सावलीत पडलेला कांदा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonionकांदा