शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

केबीसी संशयितांच्या कोठडीत वाढ

By admin | Updated: July 22, 2014 01:01 IST

सोमवारपर्यंत साडेचार हजार तक्रारदार : फसवणुकीची रक्कम १३७ कोटींवर

नाशिक : केबीसी मल्टिट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालकांनी केलेली मराठवाडा, विदर्भ, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यासह हजारो गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या फ सवणूक प्रकरणात आडगाव पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांच्या पोलीस कोठडीत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩयूक़ापडी यांनी २४ जुलैपर्यंत वाढ केली आहे़ दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील केबीसीच्या प्रमुख कार्यालयाची झडती घेण्याची परवानगीही पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आहे़आडगाव पोलिसांनी केबीसीचे संचालक बापूसाहेब चव्हाण, व्यवस्थापक व एजंट पंकज श्ािंदे, वाहनचालक नितीन शिंदे यांना सोमवार (दि़१४) रोजी नांदूरनाका परिसरात वाहनातून जात असताना अटक केली, तर मंगळवारी (दि़१५) रोजी नानासाहेब चव्हाण, साधना चव्हाण, पोलीस कर्मचारी संजय जगताप यांना अटक केली होती़ या सर्वांना न्यायालयाने २१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली होती़ या सर्वांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयासमोर हजर केले असता गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली आहे़सोमवारी आडगाव पोलिसांनी न्यायालयात केबीसीच्या मुख्य कार्यालयाची झडती घेण्याची परवानगी मागितली आहे़ केबीसीने फ सवणूक केलेल्या तक्रादारांच्या संख्येत व रकमेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ (प्रतिनिधी)पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत तक्रारदारांची संख्या साडेचार हजारांपर्यंत पोहोचली असून, फसवणुकीची रक्कम १३७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे़सशयितांच्या बँक खात्यांची चौकशीकेबीसी फ सवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित भाऊसाहेब चव्हाण,आरती चव्हाण, बापूसाहेब चव्हाण,साधना चव्हाण,नानासाहेब चव्हाण,पोलीस कर्मचारी संजय जगताप, कौसल्या जगताप, भारती शिलेदार यांच्या बँक खात्यांची माहिती पोलिसांना कळवावी असे पत्र बँकांना पाठविण्यात आले आहे़ तसेच या खात्यातील व्यवहार बंद करावेत तसेच लॉकरची माहिती द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे़ या पत्रान्वये काही बँकांनी आम्हाला तशी माहिती दिली आहे़-अनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आडगाव़गुंतवणूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चाफ सवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी छावा संघटनेच्या माध्यमातून केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीची स्थापना केली आहे़ या समितीच्या वतीने बुधवार (दि़२३) सकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे़ यामध्ये मराठवाडा, विदर्भ,अहमदनगर, तसेच नाशिक जिल्ह्णातील सुमारे पाच हजार गुंतवणूकदार सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष करण गायकर,कार्याध्यक्ष गणेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली़