शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा परिसरात हायड्रोकार्बन इंधनाची शोधमोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 01:13 IST

येवला तालुक्यातील पाटोदा, लौकी शिरसगाव परिसरात शुक्रवारपासून (दि. २८) पेट्रोल-डिझेल व हायड्रोकार्बनचे साठे शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे.

पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा, लौकी शिरसगाव परिसरात शुक्रवारपासून (दि. २८) पेट्रोल-डिझेल व हायड्रोकार्बनचे साठे शोधण्याची मोहीम सुरू झाली आहे. सकाळपासून ही यंत्रणा परिसरातील पाटोदा पठाण नाला, लौकी, शिरसगाव, जऊळके, निळखेडे आदी भागात शोध मोहीम राबवित आहे. दिवसभरात ही यंत्रणा सुमारे वीस किलोमीटर अंतराच्या लांबीत शेकडो ठिकाणी बोअरवेल घेत असून, या बोरवेलच्या खड्ड्यात स्फोट घडवले जात आहे. या भागात इंधन सर्वेक्षण करणारी यंत्रणा दाखल झाली असल्याने ही यंत्रणा पाहण्यासाठी तालुक्यातील तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ कुतूहलापोटी गर्दी करीत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात ही शोध मोहीम राबविली जात आहे. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी हायड्रोकार्बनचे साठे आहे की नाही याचा शोध घेण्यासाठी हायड्रोकार्बन इंधन सर्वेक्षणास राज्यातील जालना येथून सुरु वात झाली आहे.  ही शोध यंत्रणा येवला तालुक्यातील पाटोदा व लौकी शिवारात लवाजम्यासह दाखल झाली आहे. परिसरातील मुरमी, सोमठाणदेश, कातरणी, नीळखेडे, लौकी शिरसगाव, जऊळके, देशमाने व परिसरातील गावांमध्ये ही शोध मोहीम राबविणार आहे.शुक्र वारी ही यंत्रणा परिसरात दाखल झाली आहे. सेन्सरद्वारे जमिनीचे परीक्षण करून त्या ठिकाणी बोअरवेल घेतले जाते. नंतर त्या बोअरवेलमध्ये स्फोट घडवून भूगार्भाचे नमुने घेतले जातात. व त्यानंतर या भागात इंधन साठे आहे की नाही याचा शोध घेतला जाणार आहे. या परिसरात किती फुटांपर्यंत बोअरवेलचे खोदकाम करावयाचे याचा आराखडा यंत्रणेकडे उपलब्ध असून, लौकी शिरसगाव या भागात पंच्याहत्तर फूट खोल बोअरवेल घेतले जात आहे.येवला तालुक्यात यापूर्वीही अशी शोध यंत्रणा येऊन त्यांनी याच परिसरातील निळखेडे, मुरमी, कातरणी, आडगाव रेपाळ, विखरणी येथे शोध घेऊन चाचणी घेतली होती. पुन्हा याच भागात शोध मोहीम राबविली जात असल्याने शेतकरी वर्गामध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.२५ ट्रॅक्टरसह मोठ्या बोअरवेल गाड्याच्ओएनजीसी कंपनीच्या वतीने हे हायड्रो इंधन सर्वेक्षण सुरू आहे. या कंपनीचे सुमारे ५०० ते ७००० कर्मचारी या शोध मोहिमेत सहभागी झालेले आहे. त्यांच्याकडे जमिनीत बोअरवेल घेण्यासाठीचे सुमारे २५ ट्रॅक्टर तसेच मोठ्या बोरवेल गाड्यांचा ताफा आहे. प्रत्येक ट्रॅक्टरसाठी दिवसाकाठी जमिनीत सरासरी १०० फूट खोलीचे बोअरवेल घेऊन चाचपणी करण्यात येत आहे.

टॅग्स :ONGCओएनजीसीNashikनाशिकPetrolपेट्रोल