शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

विद्यार्थिनींना आरोग्यासह सुरक्षिततेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 10:53 PM

मालेगाव येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आरोग्य मंत्र, किशोरी संवाद आणि महिला जागरुकता यविषयी चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह या होत्या.

ठळक मुद्देमालेगाव । पोलीस दलातर्फे चर्चासत्र उत्साहात

मालेगाव : येथील पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात आरोग्य मंत्र, किशोरी संवाद आणि महिला जागरुकता यविषयी चर्चासत्र घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह या होत्या.चर्चासत्रात डॉ. रश्मी सोमाणी यांनी निरोगी आरोग्यासाठीचे नियोजन विशद केले. शारीरिक बदल, फलहार कसा घ्यावा, पाणी कसे प्यावे तसेच मोबाइलचा वापर याविषयी त्यांनी सूचना दिल्या. डॉ. हेमांगी वाव्हळ यांनी स्रियांच्या समस्या आणि स्वच्छतेअभावी होणाऱ्या आजारांची माहिती दिली. तर आजारांपासून दूर राहण्यासाठी घ्यावयाची काळजी डॉ. जोहरा मखदुमी यांनी समजावून सांगितली. यावेळी भारतीय दंड विधान, महिलांसंबंधीचे कायदे आणि अन्यायाविरोधात न्याय कसा मागावा, तक्रार कशी करावी याबद्दल डॉ. एम. डी. कांबळे यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थिनींना सक्षम व सुरक्षित राहण्याचा संदेश दिला. राजस्थानमधील भवरीदेवी घटनेचे उदाहरण देत अन्यायाविरोधात सक्षम लढा देण्याचा सल्ला न्यायाधीश ए. एम. तामणे यांनी दिला. विशाखा समिती स्थापनेविषयी माहिती देण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी आणि वेळेचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. सायबर सेलचे पोलीस उपनिरीक्षक कल्पेश दाभाडे यांनी माहिती दिली.कायद्याची गुन्ह्यांचे दाखले देऊन मोबाइलद्वारे घडणारे गुन्हे व सुरक्षितता याबद्दल प्रबोधन केले. अध्यक्षीय भाषणात जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. आरती सिंह यांनी स्वरक्षणाची काळजी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास आणि मोबाइलचा वापर या मुद्द्यांच्या आधारे मार्गदर्शन केले. आरोग्य, शिक्षण, करिअर, सायबर क्राइम व महिला सुरक्षाविषयक कायदे या मुद्द्यांच्या आधारे तज्ज्ञांनी विद्यार्थिनींचे प्रबोधन करीत आत्मविश्वास वाढविला. या चर्चासत्राला एटीटी हायस्कूल, जेएटी हायस्कूल, मसगा महाविद्यालय, काकाणी महाविद्यालय, मराठा महाविद्यालय, वर्धमान, शहर महाविद्यालय, समता महाविद्यालयातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स