गुट्टे महाराजलिखित श्री गणेश स्तुतीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:15 IST2021-01-23T04:15:00+5:302021-01-23T04:15:00+5:30

नाशिक : संत साहित्याचे अभ्यासक तथा श्री सिद्धीविनायक मानवकल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या श्री ...

Gutte Maharaj written by Shri Ganesh Stuti | गुट्टे महाराजलिखित श्री गणेश स्तुतीचे

गुट्टे महाराजलिखित श्री गणेश स्तुतीचे

नाशिक : संत साहित्याचे अभ्यासक तथा श्री सिद्धीविनायक मानवकल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या श्री गणेश स्तुती या भावार्थासहीत दुसऱ्या आवृत्तीच्या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय निवासस्थानी पार पडले.

यावेळी डॉ.गुट्टे महाराज यांनी सांगितले की, याच पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन भाजपचे दिवंगत नेते, माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिराच्या सभागृहात पार पडले होते. पहिल्या तसेच दुसऱ्या आवृत्तीमधील तसेच ‘मुक्ताई जाहली प्रकाश’ या पुस्तकाविषयी डॉ.गुट्टे महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली. कार्यक्रमास राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी( किर्गिस्थान), माथाडी कामगार संघटने प्रमुख नेते नरेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश चिटणिस लक्ष्मण सावजी, पोलीस नाईक एस. डी. खरात, शाम पिंपरकर, वाल्मिक गोल्हेर, देवेंद्र साळी, फुलचंद आघाव, लक्ष्मण गायकवाड, अर्जुन फड आदी उपस्थित होते.

फोटो

नाशिक : संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांच्या श्री गणेश स्तुतीच्या दुसऱ्या आवृत्तीच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. समवेत डॉ.गुट्टे महाराज, राजनैतिक अधिकारी देवेंद्र साळी, लक्ष्मण सावजी, एस. डी. खरात, शाम पिंपरकर आदी

(फोटो २२गुट्टे महाराज)

Web Title: Gutte Maharaj written by Shri Ganesh Stuti