शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षाला नीचांकी भाव

By admin | Updated: April 29, 2017 01:03 IST

सायखेडा : द्राक्षाला किलोमागे केवळ १० रुपये असा नीचांकी भाव मिळू लागला असल्याने द्राक्ष बागायतदार चिंतित झाले आहे.

सायखेडा : निफाड तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक असलेल्या द्राक्षाला किलोमागे केवळ १० रुपये असा नीचांकी भाव मिळू लागला असल्याने द्राक्ष बागायतदार चिंतित झाले असून, जिल्ह्यात एकूण ३५ टक्के द्राक्षक्षेत्र खुडणीच्या प्रतीक्षेत असल्याने भाव अजून किती गडगडतील याचा विचार करूनच उत्पादक हवालदिल झाले आहेत. हा दहा वर्षांतील सर्वात नीचांकी भाव आहे. एक एकर द्राक्षबाग पिकविण्यासाठी अडीच लाख रुपये खर्च येतो. यंदा पिकवलेला माल खरेदीसाठी व्यापारीच बागेत येत नसल्याने केलेला खर्च कसा निघणार याचीच चिंता उत्पादकांना लागून आहे. त्यात मुलीचे लग्न, मुलांवरचा शिक्षणासाठीचा खर्च, दवाखाना आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी लागणारा खर्च यासाठी पैसा कोठून आणावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून द्राक्षांकडे पाहिले जाते. अनेक उच्चशिक्षण घेतलेले युवक द्राक्षपीक चांगले पैसे मिळवून देते तसेच या पिकासाठी बँक कर्ज उपलब्ध करून देते म्हणून द्राक्षपीक घेण्याकडे त्यांचा कल वाढतो आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक म्हणून द्राक्षपीक पुढे आले. मागील काही वर्षी शेतकऱ्यांना द्राक्षाने चांगले पैसे मिळवून दिले. यंदा मात्र द्राक्षपिकाने शेतकऱ्यांना जिवंतपणीच मरणयातना भोगायला लावण्याची वेळ आणली आहे.मागील वर्षी या दिवसात द्राक्षाला किलोला ४२ ते ४५ रुपये भाव मिळत होता. यंदा मात्र केवळ १० ते १७ रुपये भाव मिळत आहे. भावात इतक्या मोठ्या घसरगुंडीने उत्पादक चिंतित झाला आहे. सन २०१६ मध्ये निर्यातक्षम द्राक्षाला एप्रिल महिन्यात ७० ते ७५ रुपये भाव मिळत होता, तर यंदा अतिशय कमी प्रमाणात द्राक्ष निर्यात चालू असून, केवळ ३० ते ३७ इतका नीचांकी भाव मिळत आहे. यंदा सव्वा लाख एकर द्राक्ष निर्यातीची नोंद कृषी विभागाकडे आहे, तर २०१६ मध्ये एक लाख पाच हजार एकर नोंद करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत फारशी जास्त नोंद नसली तरी भाव मात्र भाव कमालीचे कोसळले आहेत. २०१६ मध्ये ६९८९ कंटेनरमधून एक लाख १६ हजार १६४ मेट्रिक टन द्राक्ष विदेशात गेले होते, तर यंदा आजपर्यंत ८३५४ कंटेनरमधून एक लाख १४ हजार २६० मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत जास्त निर्यात होऊनदेखील बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांच्या हातात म्हणावे असे पैसे आलेच नाहीत. (वार्ताहर)