निलंबित असूनही ग्रामसेवक कामावर हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 11:30 PM2020-10-01T23:30:58+5:302020-10-02T01:07:18+5:30

येवला : तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामसेवकास भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात येऊनही ते कामावर हजर असल्याचे आणि प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याची तक्रार अ‍ॅड. एकनाथ ढोकळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांचीच चौकशी करा, याशिवाय डोंगरगाव ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारात अडकलेल्या सर्वांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणीही ढोकळे यांनी केली आहे.

Gramsevak present at work despite suspension | निलंबित असूनही ग्रामसेवक कामावर हजर

निलंबित असूनही ग्रामसेवक कामावर हजर

Next
ठळक मुद्देप्रशासन अनभिज्ञ : डोंगरगाव ग्रामपंचायतीचा कारभार

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामसेवकास भ्रष्टाचाराच्या आरोपावरुन येवला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून निलंबित करण्यात येऊनही ते कामावर हजर असल्याचे आणि प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याची तक्रार अ‍ॅड. एकनाथ ढोकळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी यांचीच चौकशी करा, याशिवाय डोंगरगाव ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचारात अडकलेल्या सर्वांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणीही ढोकळे यांनी केली आहे.
ढोकळे यांनी तक्रारीत म्हटले आहे, तालुक्यातील डोंगरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. रंजक महाराज ढोकळे यांनी केलेल्या तक्र ारी नंतर याआधीच ग्रामपंचायत अधिनियम कलम १४ ग अन्वये येथील चार ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी यांनी निलंबित केलेले असून त्यांचे अपील देखील विभागीय आयुक्त यांनी फेटाळून लावलेले आहे. त्याआधी डोंगरगावला कार्यरत असलेल्या ग्रामसेवक तुपे यांचे देखील प्रशासनाने निलंबन केले होते. याशिवाय, डोंगरगाव येथे रु जू झालेले व पूर्वीचीच निलंबनाची कार्यवाही सुरु असलेले ग्रामसेवक ठोंबरे यांच्यावर ६ लाख ६१ हजार रु पयांचा भ्रष्टाचार केला म्हणून येवला पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी त्यांना निलंबित केले होते. असे असतांनाही हे ग्रामसेवक आजही कामावर हजर आहेत. एवढेच नव्हे तर ते डोंगरगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमोरील सुनावणीलाही हजर राहिलेले होते. ढोकळे यांनी सुनावणी दरम्यान जेंव्हा ही बाब कार्यकारी अधिकारी यांच्या लक्षात आणून दिली तेव्हा ठोंबरे यांच्या निलंबनाबाबत स्वत: ठोंबरे यांनाही माहीत नसल्याचे समोर आले. सुनावणीसाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी, येवला येथील विस्तार अधिकारी अहिरे हे उपस्थित होते, मात्र त्यांनाही या निलंबनाबद्दल काहीही माहिती नसल्याची माहिती त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. याप्रकरणी निलंबनाचे आदेश देणारे गटविकास अधिकारी यांची चौकशी करावी, अशी मागणी अ‍ॅड. एकनाथ ढोकळे यांनी केली आहे.

Web Title: Gramsevak present at work despite suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.