शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
6
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
7
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
8
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
9
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
10
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
12
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
13
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
14
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
15
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
16
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
17
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
18
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
19
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
20
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक

नाशिकमध्ये तरुणीचे धाडस : चोरट्याने हिसकावलेली अडीच लाखांची बॅग पुन्हा परत मिळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:09 PM

यावेळी तरुणीने हिम्मत करून दुचाकीने चोरट्याचा पाठलाग करत झटापट करून पैशांची बॅग परत ताब्यात घेतली; मात्र बॅग हिसकावताना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

ठळक मुद्दे बॅग हिसकावताना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी वीस मिनिटांत दोन घटना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

नाशिक : द्वारकेकडून उपनगरच्या दिशेने मोपेड दुचाकीवरून तरुणी घरी जात असताना नासर्डी पुलालगत एका दुचाकीस्वार चोरट्याने २लाख ७० हजारांची रोकड असलेली बॅग मागे बसलेल्या तरुणीच्या आईच्या हातातून हिसकावली. यावेळी तरुणीने हिम्मत करून दुचाकीने चोरट्याचा पाठलाग करत झटापट करून पैशांची बॅग परत ताब्यात घेतली; मात्र बॅग हिसकावताना तरुणीची आई खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, द्वारका येथील एका बॅँकेतून पैसे काढून तक्षशिला चंद्रशेखर गायकवाड (२८) ही तरुणी आपल्या आईसोबत घराकडे मोपेड दुचाकीने (एमएच १५, एफआय ००६१) निघाली असता एका दुचाकीस्वार चोरट्याने पाळत ठेवून त्यांचा पाठलाग केला. नासर्डी पुलाजवळ त्या आल्या असता, वळणावर चोरट्याने मागे बसलेल्या गायकवाड यांच्या हातातील पैशांची रोकड असलेली बॅग हिसकावली. दरम्यान, त्या खाली कोसळल्या. दुचाकी चालवत असलेली तरुणी तक्षशिला हिने स्वत:चा तोल सावरला आणि चोरट्याचा पाठलाग करून धाडसाने त्याच्या हातातील पैशांची बॅग पुन्हा ताब्यात घेतली. यावेळी झालेल्या झटापटीत चोरट्याच्या दुचाकीचा क्रमांक तरुणीला बघता आला नाही. नागरिकांची गर्दी जमू लागल्याने चोरट्याने दुचाकीवरून पळ काढला. हा थरार बुधवारी (दि.१४) दुपारी पाउण वाजेच्या सुमारास नागरिकांनी अनुभवला. पैशाची बॅग हिसकावल्यामुळे तक्षशिला यांच्या मातोश्री खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत तरुणीने आईला रुग्णालयात उपचारार्थ हलविले व घडलेला प्रकार मुंबई नाका पोलीस ठाण्यात जाऊन कथन केला. पोलिसांनी जबरी लुटीचा व अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा संशयित चोरट्याविरुद्ध दाखल केला आहे. एकूणच धाडसी तरुणीच्या प्रसंगावधानामुळे रोकड सुरक्षित राहिली. तरुणीने न घाबरता चोरट्याचा पाठलाग करून चालत्या दुचाकीवरूनच झटापट करत पैशाची बॅग पुन्हा ताब्यात घेतली. याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.---वीस मिनिटांत दोन घटनानासर्डी पुलालगत जबरी चोरीचा दुचाकीस्वाराकडून झालेला हा प्रयत्न धाडसी तरुणीने हाणून पाडला. ही घटना १२ वाजून ४० मिनिटाला घडली. सुमारे वीस मिनिटे उलटत नाही तोच पुन्हा या घटनास्थळापासून बोधलेनगरच्या जवळपास मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका दुचाकीस्वाराने चारचाकीस्वाराला अडवून मारहाण करत गळ्यातील ५० ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून पोबारा केला.

 

टॅग्स :NashikनाशिकCrimeगुन्हाtheftचोरी