शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

विरोधी पक्षात काम केल्यावर समाधान मिळतं - शरद पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 3:54 PM

विरोधी पक्षात राहून काम  समाधान मिळते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. 

नाशिक  - माझ्या एकूण ५२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीपैकी २७ वर्षे मी विरोधी पक्षात राहिलो आहे. विरोधी पक्षात राहून काम  समाधान मिळते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले. ''- माझ्या एकूण ५२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीपैकी २७ वर्षे मी विरोधी पक्षात राहिलो आहे. विरोधी पक्षात राहून काम केल्यावर एक वेगळेच समाधान मिळते.'' येत्या आठवडाभरात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुका जाहीर होतील, तसेच दिवाळीपूर्वी राज्यातील मतदान होईल, अशी शक्यताही शरद पवार यांनी वर्तवली. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. ''राज्यातील विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप एकत्र लढणार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ जागांवर लढणार असून, मित्रपक्षांना ३८ जागा सोडण्यात येतील,'' असे शरद पवार यांनी सांगितले.  तसेच जागावाटप झाल्यानंतर नागपूर, नाशिक  आणि मुंबईत जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही शरद पवार यांनी यावेळी केली.  ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याशी आपले कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करताना आजच्या नाशिकमधील कार्यक्रमाची आखणी भुजबळ यांनीच केल्याचेही शरद पवार यांनी सांगितले.  राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्या उदयनराजेंवर त्यांनी टीका केली. अन्याय झाल्याची जाणीव व्हायला उदयनराजेंना १५ वर्षे का लागलीत, अशी विचारणा त्यांनी केली.    

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019