शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला भरपावसात मोर्चा

By admin | Updated: September 27, 2016 00:37 IST

पाकविरोधात घोषणाबाजी : शहिदांना श्रद्धांजली

सिन्नर : पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून कश्मीर खोऱ्यातील उरी येथील लष्करीतळावर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहरातील मुस्लीम समाजबांधवांनी मोर्चा काढला. भरपावसात निघालेल्या या निषेध मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. दुपारी नमाजपठण झाल्यानंतर काजीपुऱ्यातून मोर्चास प्रारंभ झाला. शिवाजी चौकात माजी उपनगराध्यक्ष अ‍ॅड. इलियास खतिब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मोर्चात विद्यार्थी, तरुण, वृद्धांसह शेकडो मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. गणेशपेठ, लालचौक ते वाचनालय मार्गाने मोर्चा शिवाजी चौकात आला. या ठिकाणी पाकिस्तान सरकार विरोधात घोषणाबाजी करत घटनेचा निषेध करण्यात आला. संतप्त तरुणांनी पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करीत पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा प्रतीकात्मक पुतळा पायाखाली तुडवून रोष व्यक्त केला. पाकिस्तान सरकार दहशतवादी कृत्यांना खतपाणी देत आहे. वारंवार छुपे हल्ले करून देशात अशांतता व दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भारत सरकारने यास सडेतोड उत्तर द्यावे. पाकच्या कुटिल कारवायांना वेळीच कठोर पावले उचलून उत्तर द्यावे अशी मागणी अ‍ॅड. खतीब यांनी यावेळी केली. निषेध मोर्चात समाजाचे ज्येष्ठ हाजी नसीरभाई मनियार, हाजी सैयद रज्जाक, हाजी अमीन पठाण, रफीक हारुण खतीब, एकबाल अजमोहीन, तै. गुलाब, निसार शेख, मजीदभाई मोमीन, शब्बीर हमिदुल्ला, शेख शब्बीर गुलाब, नजीर मनियार, पप्पू मणियार, मुजाहिद पटेल, लियाकत शेख, साजीद खतीब, मुजाहिद खतीब, रईस हिसामोद्दीन काजी, अरयाज शेख, दिलनवाज कोरबे, सलीम आत्तारी, अजीज हसन, तन्वीर मोमीन यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लीम समाजबांधव सहभागी झाले होते. (वार्ताहर)