शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

दोघे गंभीर: सिलिंडर स्फोटात भाजलेल्या चौघांनी गमावले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2020 5:45 PM

अनधिकृतपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर तसेच नादुरूस्त झालेली गॅसची नळी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत स्व:तासह परिसरातील नागरीकांच्या घरांना आगीचा धोका पोहचविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात मालवली प्राणज्योतभारतनगरची घटना

नाशिक : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील नदीकाठालगत असलेल्या भारतनगर झोपडपट्टीमध्ये मंगळवारी (दि.१) अचानकपणे घरगुती वापरात असलेल्या व्यावसायिक सिलिंडरचा स्फोट झाला होता. या दुर्घटनेत खोलीत राहणारे सहा इसम भाजले होते. प्रारंभी त्यांची प्रकृती स्थिर होती; मात्र जखमींपैकी चौघा युवकांचा शुक्रवारी (दि.४) उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले. या घटनेने भारतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मुंबईनाका पोलिसाांनी दिलेली माहिती अशी, येथील मशिदीच्या पाठीमागे असलेल्या चाळीतील-४ क्रमांकाच्या खोलीत सहा कामगार युवक भाडेतत्वावर एकत्र राहत होते. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे झोपेतून उठल्यानंतर गॅस पेटविण्याचा प्रयत्न केला असता अचानकपणे स्फोट होऊन भडका उडाला. या दुर्घटनेत स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, घराचे पत्र्याचे छप्पर तर उडालेच; मात्र छप्परवर केलेले सीमेंट-विटांचे बांधकामही कोसळून पडले होते. दरम्यान,परिसरातील रहिवाशांनी तत्काळ रशीद लतीफ अन्सारी (३०), मोहम्मद अमजद अब्दुल रऊफ अन्सारी (३०), मोहम्मद मुर्तुजा अन्सारी (३०) मोहम्मद आफताब आलम (१९) यांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृतीही गंभीर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच मुंबईनाका पोलीस ठाण्यात घरमालकासह भाडेकरू असलेल्या जखमी आणि मृतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृतपणे व्यावसायीक गॅसचा घरगुती वापर तसेच नादुरूस्त झालेली गॅसची नळी याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत स्व:तासह परिसरातील नागरीकांच्या घरांना आगीचा धोका पोहचविण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्यात भाडेकरूची माहिती लपविल्याप्रकरणी घरमालकाविरूध्दही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलDeathमृत्यूAccidentअपघात