शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर ‘सॉ-मिल’वर वनविभागाचा छापा; आरायंत्र जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 16:20 IST

मातोरी शिवारात संशयित आरोपी पांडुरंग मुरलीधर चारोस्कर याने त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना लाकूड कापण्याची आरागिरणी सुरू केली होती.

ठळक मुद्देसंशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित चारोस्कर हा फरार झाला

नाशिक : मागील काही दिवसांपासून अवैधरित्या मौजे मातोरी शिवारात बेकायदेशीरपणे ‘सॉ-मिल’ सुरू करून तेथे आरायंत्र उभारून वृक्षांच्या लाकडांची कत्तल केली जात होती. याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे शनिवारी (दि.१६) सकाळच्या सुमारास नाशिक पश्चिम वनविभागाच्या प्रादेशिक पथकाने छापा टाकून आरागिरणी उद्ध्वस्त केली.याबाबत वनविभागाच्या सुत्रांनी दिलेली माहिती अशी, मातोरी शिवारात संशयित आरोपी पांडुरंग मुरलीधर चारोस्कर याने त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागे रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत विनापरवाना लाकूड कापण्याची आरागिरणी सुरू केली होती. या आरागिरणीमध्ये मोठमोठ्या वृक्षांच्या फांद्या, बुंध्यांची कापणी केली जात होती. यासाठी संशयित चारोस्कर याने १६इंची करवत (ब्लेड) असलेले उभे आरायंत्रदेखील उभारले होते. या उभ्या आरायंत्रामार्फत सर्रासपणे लाकडांची कापणी येथे मागील काही महिन्यांपासून केली जात होती. याबाबत वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे त्यांनी सहायक वनसंरक्षक गणेश झोळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मधुकर गोसावी, अनिल अहिरराव, शांताराम भदाणे, ओंकार देशपांडे, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, सचिन अहिरराव, उत्तम पाटील, रोहिणी पाटील, वर्षा पाटील यांच्या पथकाने आरागिरणीवर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धाड टाकली. यावेळी संशयित चारोेस्कर हा राहत्या घरी आढळून आला नाही. आजुबाजूला वनकर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता तो बाहेरगावी गेला असल्याचे समजले. पथकाने आरायंत्र, १ इलेक्ट्रिक मोटारसह संपुर्ण सांगाडा असा एकूण ५० ते ६० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयिताविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भदाणे करीत आहेत. संशयित चारोस्कर हा फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याचे सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकforest departmentवनविभागCrime Newsगुन्हेगारी