शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

जेवणाचा दर्जा योग्य आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:24 IST

राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सकाळी समाज कल्याण विभागाच्या नाशिक - पुणे रस्त्यावरील मुलींच्या शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी शंभरकर यांनी थेट मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी व्यक्तीगत पातळीवर संवाद साधतांना

ठळक मुद्देसमाजकल्याण आयुक्तांचा थेट वसतिगृहातील मुलींशी संवाद !राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांची शासकीय वसतिगृहास अचानक भेट

नाशिक : ‘आपल्या पैकी कोण सीईटी परीक्षेची तयारी करत आहे? क्लास लावला आहे का ? अभ्यासिका चांगली आहे का ? इंटरनेट सुविधा आहे का ? जेवण चांगले आहे का ? स्वच्छता चांगली आहे का ? परिसर कसा आहे? असल्या प्रकारचे एकामागोमाग असंख्य प्रश्नांची सरबत्ती करून आस्थेवाईकपणे मुलींशी शनिवारी सकाळी राज्याचे समाजकल्याण आयुक्त मिलींद श ंभरकर यांनी थेट संवाद साधला. यावेळी विद्यार्थिनींनीही पटापट उत्तरे देत त्यांचे समाधान केले.राज्याचे समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शनिवारी सकाळी समाज कल्याण विभागाच्या नाशिक - पुणे रस्त्यावरील मुलींच्या शासकीय वसतिगृहास अचानक भेट दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी शंभरकर यांनी थेट मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थिनींशी व्यक्तीगत पातळीवर संवाद साधतांना त्यांना मिळणा-या सुख, सोयींबरोबरच शैक्षणिक प्रगतीबाबत तसेच भवितव्याबाबत चर्चा केली. यावेळी प्रादेशिक उपआयुक्त राजेंद्र कलाल, विशेष अधिकारी देविदास नांदगावकर, गृहप्रमुख सरिता रेड्डी, सविता गवारे, नंदा रायते व सुभाष फड आदी उपस्थित होते.यावेळी शंभरकर यांनी मुलींना आपली नियमित आरोग्य तपासणी होते? हिमोग्लोबीन तपासणी केव्हा झाली? वसतिगृहाच्या वेळापत्रकात आरोग्य तपासणी समाविष्ट असते? असे प्रश्न विचारून त्यांनी मुलींच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या. वसतिगृहातील आहार पुरेशा आहे का? आपणास नासत्यात दूध, अंडी, फळे नियमीत भेटतात का ? संगणकरूम मध्ये इंटरनेट सुविधा आहे का? अभ्यासिकेत पुस्तके आहेत का ? आपण स्पर्धा परीक्षा पुस्तके वापरता का ? असा प्रकारे संवाद साधत आयुक्तांनी उपस्थित विद्यार्थिनींना परीक्षांचा शुभेच्छा दिल्या.यावेळी आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी शासकीय वसतिगृहाचा फेरफटका मारला. मुलींच्या निवास रूम मधील सुविधांची पाहणी करून वसतिगृहाच्या स्वच्छता बाबत उपस्थित गृह प्रमुखांना सुचना दिल्या. 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक