शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष्यांची तहान-भूक भागवण्यासाठी मंदिर परिसरात अन्न-पाण्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 18:36 IST

कवडदरा : सध्या कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असून, इगतपुरी तालुक्यातील साकूर परीसरातील घोटी- सिन्नर हायवे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पक्षीप्रेमींनी पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व अन्नाची सोय केली आहे. उन्हाळ्यात निसर्गाशी नाते असलेल्या छोट्या पक्ष्यांचा किलबिलाट अंगणात सदैव राहावा, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक पक्षीप्रेमी, तरुण उत्साही आहेत. बहुतांश पक्षीप्रेमींनी आपल्या घराजवळ पाणी व अन्नाची सोय केली आहे. तर काहींनी पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहेत. त्यामुळे या भागात पक्ष्यांची तहान-भूक भागवणारे हात वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देमंदिराच्या आवारात खाद्य व पाण्याची सोय

कवडदरा : सध्या कडक उन्हाळ्यास सुरुवात झाली असून, इगतपुरी तालुक्यातील साकूर परीसरातील घोटी- सिन्नर हायवे रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी पक्षीप्रेमींनी पक्ष्यांसाठी पिण्याचे पाणी व अन्नाची सोय केली आहे. उन्हाळ्यात निसर्गाशी नाते असलेल्या छोट्या पक्ष्यांचा किलबिलाट अंगणात सदैव राहावा, त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक पक्षीप्रेमी, तरुण उत्साही आहेत. बहुतांश पक्षीप्रेमींनी आपल्या घराजवळ पाणी व अन्नाची सोय केली आहे. तर काहींनी पक्ष्यांच्या निवाऱ्यासाठी प्रयत्न केलेले दिसत आहेत. त्यामुळे या भागात पक्ष्यांची तहान-भूक भागवणारे हात वाढत असल्याचे समाधानकारक चित्र पाहावयास मिळत आहे.साकूर परीसरातील सिन्नर घोटी रस्त्यावरील बेलूफाटा परीसरातील श्री साई मंदिर परिसरात देवस्थानने पक्ष्यांसाठी मंदिराच्या आवारात खाद्य व पाण्याची सोय करून एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे.गतवर्षी अनेकांनी टाकऊ प्लॅस्टिकचे कॅन, बाटल्या कापून त्यात पाणी व दाणे भरून ठेवले होते. पण, प्लॅस्टिक पाहून पक्षी बिचकत असल्याचे निदर्शनास आल्याने यंदा अनेकांनी मातीच्या भांड्यात अन्न-पाण्याची सोय केली आहे. त्यामुळे कधी काळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने होणारी घराघरांतील सकाळ आता पुन्हा एकदा अनुभवयास मिळत असल्याचे अनेकजण बोलून दाखवत आहेत.सध्या, उष्णतेच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांची परिस्थिती अवघड बनलेली आहे. त्यांना अशा परिस्थितीत पाणी उपलब्ध करून देणे आपले दायित्व आहे. पक्ष्यांची अन्न-पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी प्रत्येकाने यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे मत शेतकरी, पक्षीप्रेमी संतोष झनकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिकwater shortageपाणीकपात