अवघ्या पाचच दिवसांत वराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:32 IST2019-02-23T01:31:58+5:302019-02-23T01:32:13+5:30

विवाह होवून अवघे पाच दिवस उलटलेले असतानाच वराचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. या घटनेने नववधूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 The flow of death in just five days | अवघ्या पाचच दिवसांत वराचा मृत्यू

अवघ्या पाचच दिवसांत वराचा मृत्यू

सिडको : विवाह होवून अवघे पाच दिवस उलटलेले असतानाच वराचा हृदयविकाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिडकोत घडली. या घटनेने नववधूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विवाहानंतर वैवाहिक जीवनाला सुरुवात करीत असलेल्या नवदाम्पत्याच्या बाबतीत अशी हृदयद्रावक घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, परिसरावर शोककळा पसरली आहे.
अर्ध्यावरती डाव मोडला...
मयूरने एम.टेक पदवी घेत उच्चशिक्षण घेऊन पुण्यातील एका नामांकित कंपनीत नोकरीला सुरुवात केली होती. आपले करिअर घडविल्यानंतर त्याने विवाहाचा निर्णय घेतला. परंतु, त्याला जीवन जगण्यासाठी आयुष्यच अपुरे पडल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Web Title:  The flow of death in just five days