शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

फुलशेती करणारे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 18:52 IST

कवडदरा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेती व्यवसायसुद्धा होरपळून जात आहे. त्यातही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थितीतर अधिकच बिकट होत असून इगतपुरी तालुक्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देकोरोनाची झळ : बाजारपेठेत मागणीच नसल्याने परिस्थिती बिकट

कवडदरा : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शेती व्यवसायसुद्धा होरपळून जात आहे. त्यातही फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची परिस्थितीतर अधिकच बिकट होत असून इगतपुरी तालुक्यातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे.

               शेणित, साकूर, भरवीर, बेलू परीसरातील तसेच ग्रामीण भागातील यात्रा, उत्सव कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत असल्याने बंद आहेत, यामुळे फुलांची मागणी घटली आहे. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

                      नेहमी घेतल्या जाणाऱ्या पिकाची लागवड न करता उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने साकूर परीसरातील काही शेतकऱ्यांनी फुलशेती करण्याचा विचार केला. शेतात एका एकरामध्ये झेंडू, शेवंती, लिली अशा अनेक फुलांची लागवड केली. वेगवेगळे कार्यक्रम, समारंभांमध्ये फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे त्याने हा पर्याय निवडला. मात्र, फुलांची विक्री करण्याची वेळ आली, तेव्हा कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं. कोरोना प्रतिबंधक नियम अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा परिणाम फुलशेतीवर होत आहे.

                    परिणामी फुलांना बाजारामध्ये म्हणावा तसा भाव मिळत नाहीये. शेतीमध्ये नवनवीन पिकं घेऊन काहीतरी वेगळं करु पाहणाऱ्या शेतकऱ्याच्या हाती यामुळे निराशा आली आहे. फुलांना बाजारात मागणीच नसल्यामुळे शेतातील फुलं जागेवर सडून जातायत.काही प्रमाणात फुलं विकली गेली, तरी म्हणावा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झो आहेत.शेतकऱ्यांना आर्थिक फटकावाढत्या कोरोनाच्या अफवेमुळे फुल बाजारात जात नाहीत. शेवंती, झेंडू लिली या फुलांची मी लागवड केली आहे. मात्र बाजारात भाव नसल्यामुळे तसेच ग्रामीण भागातील यात्रा, उत्सव बंद असल्याने प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान, कोरोनामुळे अचानक ओढवलेल्या या संकटामुळे फुलशेती करणारे शेतकरी संकटात सापडले आहेत. शेतात फुलं असूनही त्यांना बाजारात रास्त भाव मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.- सचिन जाधव, शेतकरी, साकूर. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी