शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बसचे ब्रेक निकामी झाल्याने पाच दुचाकींना धडक

By admin | Updated: January 8, 2015 00:52 IST

दत्तमंदिर येथील घटना : तिघेजण जखमी

नाशिकरोड : नाशिकरोडहून सातपूर शिवाजीनगरला जाणाऱ्या शहर वाहतुकीच्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने या बसने दुपारी दत्तमंदिर चौक सिग्नलवर उभ्या असलेल्या पाच मोटारसायकलना धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. तीन जण मात्र जखमी झाले आहेत.नाशिकरोडहून सातपूर शिवाजीनगरला जाण्यासाठी प्रवासी घेऊन शहर वाहतुकीची बस (एमएच १५ एके-८०८८) आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास निघाली. दत्तमंदिर चौक येथे नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या सिग्नलवर डंपर (एमएच १८ एम ७०६२) व त्याच्या बाजूला ५-६ मोटारसायकली व काही गाड्या उभ्या होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या शहर वाहतुकीच्या बसचालकाने डंपरशेजारी उभ्या असलेल्या ३-४ मोटारसायकलींना पाठीमागून जोरदार धडक दिली. पाठीमागून अचानक मोठा आवाज करत धडक बसल्याने त्या मोटारसायकलवरील चालक व सहकारी खाली पडले, तर इतर वाहनधारकांना पहिले काही समजले नाही; मात्र त्या डंपरमुळे बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला. एसटी बसच्या अपघातात एम-८० (एमएच १५ एक्स-९९२४), हिरो होंडा (एमएच १५ बीपी-८२०८), कावासाकी बजाज (एमएच १५ बीई- २६३२) या तीन गाड्या बसच्या पुढे जाऊन एकमेकांवर पडल्या, तर अ‍ॅक्टिवा (एमएच १५ ईएम-१२४०), पॅशन प्रो (एमएच १५ डीएन-९०५९) या दोन गाड्या बसच्या धडकेने शेजारी उभ्या असलेल्या डंपरखाली जाऊन पडल्या. या मोटारसायकलवरील अनिता संजय शिंदे (३५), रा. डीजीपीनगर, पुप्पा रावसाहेब भागवत (५०), रावसाहेब भागवत (६६), रा. भोर मळा नाशिकरोड हे जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर बसचालक व वाहक हे घटनास्थळावरून पळून गेले. यानंतर समाजकंटकांनी बसच्या काचेवर दगडफेक केली. (प्रतिनिधी)