रेशनवरील डाळीला मिळेना गुदाम

By Admin | Updated: August 24, 2016 00:53 IST2016-08-24T00:48:47+5:302016-08-24T00:53:20+5:30

तूरडाळ वांध्यातनिकृष्ट दर्जा : खुल्या बाजारापेक्षा अधिक दर

Find the pulses on the ration | रेशनवरील डाळीला मिळेना गुदाम

रेशनवरील डाळीला मिळेना गुदाम

नाशिक : खुल्या बाजारापेक्षा वीस रुपयांहून अधिक दर व त्यातच निकृष्ट दर्जामुळे रेशनवरील स्वस्त दरातील तूरडाळ वांध्यात सापडली असून, काही तहसीलदारांनी सदरची डाळ गुदामात उतरवून घेण्यास नकार देतानाच, खुद्द रेशन दुकानदारांनीही डाळ स्वस्त करा, तरच ताब्यात घेऊ, अशी भूमिका घेतली आहे.
दोन महिन्यांपासून खुल्या बाजारात दोनशे रुपयांना भिडलेली तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्य सरकारने स्वस्त धान्य दुकानातून प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो या प्रमाणात १०३ रुपये दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी खुल्या बाजारातून ठेकेदाराकरवी तूरडाळ पुरविण्याचा ठेकाही देण्यात आला. नाशिक जिल्ह्यासाठी चार हजाराहून अधिक क्विंटल तूरडाळ मंजूर करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून ठेकेदाराने तूरडाळ पुरविण्यास सुरुवात केली, परंतु तिचा दर्जा अगदीच निकृष्ट असल्याचे दिसून आले.
नांदगावच्या तहसीलदारांनी तूरडाळीची तपासणी केली असता, ती दर्जाहीन असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी तूरडाळ परत पाठवून दिली. असाच प्रकार नाशिकच्या धान्य वितरण अधिकाऱ्यांनी केला. खुल्या बाजारात तूरडाळीचे दर ८० ते ९० रुपये असताना १०३ रुपये दराने तूरडाळ रेशनवर विक्री होणार नाही तसेच या डाळीचा दर्जाही योग्य नसल्याचे सांगत, नाशिक शहरासाठी मंजूर करण्यात आलेली डाळ त्यांनी स्वीकारण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)

Web Title: Find the pulses on the ration