महामोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: April 2, 2016 00:07 IST2016-04-01T23:18:06+5:302016-04-02T00:07:07+5:30

महामोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

Filmmaker filed a complaint | महामोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

महामोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

नाशिक : महाराष्ट्र राज्य किसान सभेने आपल्या विविध मागण्यांसाठी शहरात जाहीर सभा व महामोर्चाचे आयोजन करून सीबीएस सिग्नलवर रस्ता अडवून आंदोलन केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात २८ आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
महाराष्ट्र किसान सभेच्या वतीने २९ ते ३१ मार्च या कालावधीत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा व महामोर्चाचे आयोजन केले होते़ या मोर्चानंतर आंदोलकांनी सीबीएस सिग्नलवर ठाण मांडून सुमारे दोन दिवस आंदोलन केले़ यामुळे शहरातील वाहतूक कोंडी निर्माण होऊन शहरवासीयांना त्रास सहन करावा लागला होता़ याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आमदार जीवा पांडू गावित, डॉ़ अशोक ढवळे, किसन गुजर, अजित नवले, माजी आमदार नरसय्या आडम, सीताराम ठोंबरे, संपत झाडे आदिंसह सुमारे २८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे़ मुंबई नाका पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी या नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Filmmaker filed a complaint