शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भाव कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल

By admin | Updated: April 3, 2017 00:41 IST

येवला : विक्र मी कांदा उत्पादन व कोसळलेले भाव यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्यासंदर्भात कृषिमंत्र्यांचा दरवाजा ठोठावला आहे.

 येवला : विक्र मी कांदा उत्पादन व कोसळलेले भाव यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेस मुदतवाढ देण्यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दरवाजा ठोठावला आहे. या योजनेस मुदतवाढ द्यावी, अशी जोरदार मागणी येवला बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व शेतकऱ्यांनी केली आहे. डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत येवला बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील इतर बाजार आवारांवर पोळ (लाल) व रांगडा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. पोषक हवामान असल्याने उन्हाळ कांद्याचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाले आहे. कांदा हा नाशवंत व जास्त दिवस न टिकणारा शेतमाल आहे. मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने कांद्याचे बाजारभाव घसरले आहेत. सद्यस्थितीत कांद्याचे बाजारभाव किमान तीनशे रुपये ते कमाल सहाशे रुपये, तर सरासरी पाचशे रुपये प्रतिक्विंटल आहे. सदर बाजारभाव अत्यंत कमी असून, या बाजारभावाने उत्पादन खर्चदेखील भरून निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. सध्या कांद्याची निर्यात चांगली सुरू आहे व परदेशात कांद्याला मागणीदेखील चांगली असल्यामुळे केंद्र शासनाने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना कायमस्वरूपी चालू ठेवावी, अशी मागणी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषा शिंदे यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत कांद्याला मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकरी बांधवांना कांदा उत्पादनासाठी येणारा खर्च, त्यासाठी सरकारी व सहकारी वित्त संस्थांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड आदि खर्चसुद्धा भागणार नसल्याने पर्यायाने शेतकरी बांधव आर्थिक अडचणीत सापडला आहे. उन्हाळ कांद्याचेही मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले आहे. कांदा निर्यातीवर निर्बंध लादू नये व कांदा निर्यात मोठ्या प्रमाणावर होण्यासाठी योजनेस मुदतवाढ देणे गरजेचे आहे. कांदा या शेतमालाच्या उत्पादनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळलेला असून कार्यक्षेत्रात कांदा लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. संपूर्ण देशाचा विचार करता महाराष्ट्र राज्याव्यतिरिक्त कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, बिहार, हरियाणा व पश्चिम बंगाल या प्रांतांतदेखील कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. उत्पादन वाढले असतानादेखील थोडेसे भाव वाढले की कांद्याची निर्यात बंदी केली जाते. (वार्ताहर)