शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराचे निर्मूलन की, तक्रारदारांचे आख्यान

By admin | Updated: December 18, 2014 22:48 IST

चुकीचा पायंडा : राज्य सरकारच्या नावे अधिकाऱ्यांना धमकी; ब्लॅकमेल करण्याचा प्रकार

नाशिक : चार महिन्यांपूर्वी भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कथित अशासकीय सदस्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील एका महिला नायब तहसीलदाराशी केलेल्या गैरवर्तनानंतर समितीच्या बैठकीत तक्रारदारांना थारा न देण्याचा निर्णय झालेला असतानाही सोमवारी संबंधित व्यक्तीला समितीच्या बैठकीत पाचारण करून त्याला शासकीय अधिकाऱ्यांकडून ठायीठायी केल्या जाणाऱ्या कथित भ्रष्टाचाराचे आख्यान ऐकण्याची मुभा शासनाच्या मुखियानेच दिल्याची बाब समस्त यंत्रणेच्या जिव्हारी लागली आहे. त्यातूनच एका अधिकाऱ्याने तक्रारदाराला खडे बोल सुनावतानाच, शासकीय अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रकार बैठकीतील उपस्थित अधिकारी सहन कसे करतात असा सवाल करून घरचा अहेरही दिल्याची चर्चा होऊ लागली आहे. जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे शासकीय पातळीवरील कथित भ्रष्टाचाराची प्रकरणे दाखल करण्याचे व त्यामागे काही विशिष्ट व्यक्तींचा विशिष्ट हेतू असल्याची बाब लपून राहिलेली नाही. त्यातही काही व्यक्तींकडून अशा प्रकारच्या तक्रारी दाखल करून नंतर संबंधित अधिकाऱ्याशी झालेले ‘साटेलोटे’ पाहता, समितीपुढे सुनावणीसाठी आलेले प्रकरणे मागे घेण्याचेही प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे समितीवर वरचष्मा ठेवू पाहणाऱ्या काही व्यक्ती कालांतराने या समितीच्या बैठकांना अशासकीय सदस्य म्हणून बेकायदेशीरपणे उपस्थित राहून शासकीय यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब चार महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात घडलेल्या एका घटनेवरून स्पष्ट झाली. परिणामी अशासकीय सदस्यांखेरीज भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीत अन्य दुसऱ्या व्यक्तीस वा तक्रारदारासही बसू न देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी घेतला. मात्र सोमवारी झालेल्या समितीच्या बैठकीत थेट तक्रारदारांवर मेहेरबानी दाखवित, त्यांना मानाचे पान देण्याचा पवित्रा बैठकीच्या अध्यक्षांनी घेतला परिणामी तक्रारदाराने शासकीय खात्यांमध्ये चालणाऱ्या भ्रष्टाचाराला उपस्थित शासकीय अधिकारीच कसे जबाबदार आहेत, याचे व्याख्यानच देण्यास सुरुवात केली. ज्या तक्रारीशी तक्रारदाराचा संबंध नाही, अशा प्रकरणांमध्येही त्याने उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केल्याने बैठकीचे वातावरण तप्त झाले. परंतु तक्रारदार करीत असलेले आरोप जणू काही मान्य आहेत, अशा अवस्थेत खाली माना घालून ऐकण्याची वेळ अधिकाऱ्यांवर आली. मात्र त्यापैकी एकाने आपला स्वाभिमान जपत, थेट तक्रारदारालाच धारेवर धरून विषय व तक्रारीपुरतेच बोलण्याची समज दिली. शासकीय बैठकांना उपस्थित राहून काही व्यक्ती अधिकाऱ्यांवर दबाव व ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार केली. त्यावर तक्रारदाराला चाप बसला असला तरी, त्याला बैठकीत बोलविण्यामागच्या हेतुचीही चर्चा होऊ लागली आहे.