शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत पर्यावरण कार्यकर्त्यांचाही जाहीरनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 00:58 IST

कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला जात असतो. नाशिक शहरात मात्र पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा केला असून, गोदावरी प्रदूषणमुक्तीपासून प्लॅस्टिकबंदीचे मुद्दे मांडताना जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा समावेश करेल त्याच पक्षाला मतदान करा, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.

ठळक मुद्देगोदावरी प्रदूषणमुक्तीचा आग्रह

नाशिक : कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय पक्षाच्या वतीने जाहीरनामा प्रसिद्ध केला जात असतो. नाशिक शहरात मात्र पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन जाहीरनामा केला असून, गोदावरी प्रदूषणमुक्तीपासून प्लॅस्टिकबंदीचे मुद्दे मांडताना जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा समावेश करेल त्याच पक्षाला मतदान करा, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे या कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.यासंदर्भात सर्व कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक पंचवटीत गोदावरी किनारी संपन्न झाली. गोदावरी नदी व या नदीस मिळणाऱ्या उपनद्या या गटारमुक्त प्रदूषणमुक्त व कॉँक्रीटीकरण मुक्त कराव्यात, भूजल पातळी सुधारण्यासाठी विहिरी व जलस्रोत यांचे पुनर्भरण कण्यात यावे, विंधनविहिरी खोलीकरणाची मर्यादा वाढविली पाहिजे. ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ची प्रभावी अंमलबजावणी करावी, नवीन वसाहती व ग्रामीण भागात सेप्टिंक टॅँक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, वृक्षारोपण केल्यानंतर त्याचे संवर्धन करून आॅक्सिजन बॅँक तयार करावी, दरवर्षी वृक्षलागवडीचे आॅडिट करावे, डोंगर, पहाड खोदून गौण खनिजाचा उपसा बंद करावा, डोंगरांवरील अतिक्रमण थांबवून वणवामुक्त अभियान राबवावे, गडकिल्ल्यांचे संवर्धन करावे, सार्वजनिक वाहतुकीसाठी सीएनजीचा वापर झाला पाहिजे, वायू गुणवत्ता निर्देशांक ५० इतका असावा, पाला पाचोळ्यापासून कागद, खत या वस्तू तयार कराव्यात, प्राणी क्रूरता कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी, प्राण्यांसाठी रुग्णवाहिका असावी, प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशाप्रकारचा हा जाहीरनामा आहे.यासंदर्भात उपस्थित सर्वांनीच पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली. यात जसबीर सिंग, प्रा. सोमनाथ मुठाळ, कचरू वैद्य, अ‍ॅड. अमोल घुगे, योगेश घुगे, अमित कुलकर्णी, नितीन कोळेकर, निशिकांत पगारे, सविता सिंह, योगेश बर्वे यांच्यासह विविध पर्यावरण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019environmentपर्यावरणgodavariगोदावरी