शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण मंडळ कारभाराची लक्तरे

By admin | Updated: March 18, 2015 23:10 IST

प्रशासनाधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर आरोप : साडेतीन तासांच्या चर्चेनंतर मूळ सेवेत पाठवणी

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारनाम्यांनी वादग्रस्त ठरलेल्या मनपा शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती किरण कुंवर यांच्या कारभाराची लक्तरेच संतप्त सदस्यांनी महापालिकेच्या महासभेत टांगली. सदस्यांनी पुराव्यांनिशी गंभीर आरोपांच्या फैरी झाडत कुंवर यांच्या कारभाराचा पंचनामा केला. तब्बल साडेतीन तासांच्या वादळी चर्चेनंतर अखेर सभागृहाचा कल लक्षात घेता प्रशासनाधिकाऱ्यांची मुदत संपल्याचे कारण दर्शवित त्यांची परत मूळ सेवेत रवानगी करण्याचा निर्णय महापौरांनी घोषित केला. महापालिकेची महासभा प्रामुख्याने शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी श्रीमती कुंवर यांच्या कारनाम्यांनीच गाजली. विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर यांनी प्रारंभी शिक्षण मंडळात चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या निर्णयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. गणवेश खरेदीबाबत सभागृहाला चुकीची माहिती दिल्याबद्दल बडगुजर यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यावेळी कुंवर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपली पहिलीच महासभा असल्याने उत्तर देताना गोंधळ उडाल्याचे सांगत सभागृहाची माफी मागितली. परंतु या माफीने समाधान न झाल्याने बडगुजर यांनी मागील महासभेत झालेल्या चर्चेचे रेकॉर्डिंगच मोबाइलवरून सभागृहाला ऐकविले. सदर रेकॉर्डिंग ऐकवताना महापौर आणि बडगुजर यांच्यात खटकेही उडाले. बडगुजर यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मनपा सेवेत रुजू करून घेणे, पोषण आहारासाठी निधी मागताना खोट्या स्वाक्षऱ्या केल्याबद्दल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्याने प्रशासनाधिकाऱ्याला पाठविलेले पत्र यासह विविध विषयांवर मत मांडले.