पाथरे विद्यालयात इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

By Admin | Updated: September 3, 2016 23:06 IST2016-09-03T23:06:19+5:302016-09-03T23:06:31+5:30

पाथरे विद्यालयात इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

Eco-friendly Ganesh idol Workshop in Pathare Vidyalaya | पाथरे विद्यालयात इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

पाथरे विद्यालयात इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा

 पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे हायस्कूल व एसजी कनिष्ठ महा-विद्यालयात इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
कार्यशाळेसाठी विद्यालयाने शाडूमाती उपलब्ध करून दिली होती. कलाशिक्षक प्रशांत दातरंगे, विठ्ठल पानपाटील, सुदाम भारमल, किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकाराचे गणपती साकारले. मूर्ती एक दिवस सुकल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला रंगकाम करण्यात आले. प्राचार्य विद्या साळुंखे व पर्यवेक्षक नामदेव कानसकर यांनी आकर्षक गणेशमूर्ती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. गणेशोत्सवात याच मूर्तींची स्थापना करून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे विद्यार्थ्यांना यावेळी आवाहन करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Eco-friendly Ganesh idol Workshop in Pathare Vidyalaya