दुष्काळामुळे कूपनलिका व्यवसाय तेजीत

By Admin | Updated: January 9, 2016 22:10 IST2016-01-09T22:09:06+5:302016-01-09T22:10:13+5:30

दुष्काळामुळे कूपनलिका व्यवसाय तेजीत

Due to drought, boom boosts business | दुष्काळामुळे कूपनलिका व्यवसाय तेजीत

दुष्काळामुळे कूपनलिका व्यवसाय तेजीत

ब्राह्मणगाव : येथे पाण्याची पातळी घटू लागल्याने कांदा पीक जगविण्यासाठी शेतकरी जमिनीखालील पाण्याच्या शोधासाठी फिरत आहेत. त्यामुळे सध्या पाणी पाहणाऱ्यांचा (कूपनलिका) व्यवसायही तेजीत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून पावसाने दांडी मारल्याने तसेच पडलेला पाऊस अडवला जात नसल्याने पाणीटंचाईने सर्वांनाच ग्रासले आहे. लागवडीनंतर वातावरणातील बदलाने विहिरी आटल्या तर आधी केलेले बोअरही आटल्याने नवीन बोअर करण्यासाठी पाणी पाहणाऱ्यांकडून पाणी पाहिले जात आहे. त्यामुळे कूपनलिका खोदण्याचा धडाका चालू आहे. मात्र जमिनीतच नाही तर हाती कुठून येणार. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करून पाणी शोधमोहीम चालू आहे.

Web Title: Due to drought, boom boosts business