शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

कर्जवसुलीबाबत जिल्हा बॅँकेचे बुधवारी धोरण ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 01:42 IST

जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमक्ष विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन काळजीत पडले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

नाशिक : जिल्हा बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमक्ष विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील प्रकारामुळे जिल्हा बॅँक प्रशासन काळजीत पडले असून, अशा घटनांवर मात करण्यासाठी नेमकी काय भूमिका घ्यावी, यासाठी बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलाविण्यात आली आहे. कर्जदारांनी अशी भूमिका घेतल्यास बॅँकेच्या वसुलीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेला जवळपास २२०० कोटी रुपये मार्चअखेर वसूल करण्याचे आव्हान असून, अधिकाधिक कर्ज वसुली केल्यावरच बॅँकेचे गतवैभव प्राप्त होऊन गरजू शेतकऱ्यांना पुढील काळात कर्जपुरवठा करणे शक्य होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कर्जवसुली मोहिमेंतर्गत रविवारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे वसुली पथकासमोरच मुकुंद वाजे या कर्जदाराने विषारी औषध सेवन केल्याची घटना घडली. अशा घटनेतून कायदेशीर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कर्जदारांना तगादा लावायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे़ पांढुर्ली येथील घटनेने अन्य कर्जदारदेखील त्याच पावलावर पाऊल ठेवून आत्महत्येची धमकी देत वसुलीत खोडा घालण्याचा प्रयत्न करू शकतील अशा परिस्थितीत नेमके काय करावे, यावर विचारविनिमय करण्यात येत आहे. या संदर्भात जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या संदर्भात बुधवारी सर्व संचालकांची बैठक बोलविण्यात आल्याचे सांगितले. कर्जदारांकडून बॅँकेला सहकार्याची गरज असून, वसूल केलेल्या कर्जातून अन्य ठेवीदार शेतकºयांना कर्ज दिले जाणार आहे. परंतु जर थकबाकीदारांकडून असे प्रकार होत असतील तर एकप्रकारे ते अन्य गरजू शेतकºयांवर अन्यायकारक ठरणार असून, कर्जवसुलीत आडकाठी आणणाºया थकबाकीदारांबाबत लवकरच जिल्हा बॅँक ठोस धोरण स्वीकारणार असल्याचेही केदा अहेर यांनी सांगितले. मुकुंद वाजे यांच्याकडे सन २००६ पासून कर्ज थकले असून, त्यासाठी वेळोवेळी नोटिसाही देण्यात आल्याचे व पुरेसा वेळही दिला गेल्याचे सांगण्यात आले.वसुलीचा तगादाजिल्हा बॅँकेने मार्च अखेरीस बड्या व जुन्या थकबाकीदार शेतकºयांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला असून, त्यातून वाहन कर्जापोटी ट्रॅक्टर जप्तीची मोहीम सुरू आहे. ऐपतदार शेतकºयांच्या मालमत्तांवर कर्जापोटी बोझा चढविण्याची प्रकियाही हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी