टिटोली शाळेत धान्याचे वितरण

By Admin | Updated: August 24, 2016 21:58 IST2016-08-24T21:55:08+5:302016-08-24T21:58:30+5:30

प्रशासनाला जाग : पालकांमध्ये समाधान

Distribution of grain in Titoli school | टिटोली शाळेत धान्याचे वितरण

टिटोली शाळेत धान्याचे वितरण

बेलगाव कुऱ्हे : टिटोली येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना गेल्या काही दिवसांपासून पोषण आहाराच्या खिचडीसाठी लागणारे तांदूळ अथवा कोणतेही खाद्य वस्तू अजूनही वितरित झाली नसल्याने मुलांना खिचडी मिळणे दुरापास्त होऊन बसले होते. टिटोलीसह आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याचे वृत्त मंगळवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच इगतपुरीच्या पोषण आहार योजनेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेऊन आज, बुधवारी टिटोली येथील जिल्हा परिषद शाळेला तांदूळ वाटप केले.
या आदिवासी दुर्गम भागातील शाळा लोकसहभागातून धान्य घेऊन तात्पुरती खिचडी शिजविली जात होती. आता धान्य मिळाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. महिन्यापासून आदिवासी मुले पोषण आहारापासून वंचित होते. तांदूळ उपलब्ध झाल्याने त्यांना आता दररोज खिचडी मिळू लागल्याने पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Distribution of grain in Titoli school