शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

पोलीसपाटील मानधनापासून वंचित

By admin | Updated: March 26, 2015 00:15 IST

चार महिन्यांपासून प्रतीक्षा : शासनाकडून होते दुर्लक्ष; पोलीसही महत्त्व देत नसल्याचा संघटनेचा आरोप

नाशिकरोड : पोलीसपाटील म्हणून पूर्वी असलेला सन्मान आणि अधिकार मिळावेत यासाठी सातत्याने लढत असलेल्या पोलीसपाटलांना आता मानधनासाठीही संघर्ष करावा लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून मानधनदेखील मिळाले नसल्याने पोलीसपाटलांमध्ये नैराश्य आले आहे. पोलिसांचे प्रतिनिधी म्हणून गावागावांत पोलीसपाटील नियुक्त आहेत. मात्र पोलीस आता या पोलीसपाटलांचीच सेवा घेण्यास तयार नसल्याचे बोलले जात आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या २५ पोलीसपाटील असून, अनेक गावांत पोलीसपाटलांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पोलीसपाटलांना शासनाकडून दरमहा तीन हजार रुपये मानधन दिले जाते; मात्र गेल्या चार महिन्यांपासून मानधनच देण्यात आलेले नाही. पोलीसपाटलांचा प्रवास व स्टेशनरी भत्ता तर कधीचाच बंद झाला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात रिक्त जागेवर पोलीसपाटलांची नियुक्ती करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे लक्ष द्यायला कोणीच तयार नाही. शासन व जनतेमध्ये समन्वय ठेवणे व घडलेल्या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना, शासनाला देणे आवश्यक आहे असे पोलीसपाटलाचे काम आहे. मात्र शहरीकरण व कामातील व्यापारीकरण वाढू लागल्याने पोलीसपाटील हे पद शोभेचे होऊन बसल्याचे पोलीसपाटलांचेच म्हणणे आहे. पोलीस ठाणे, तहसील कार्यालयात यापूर्वी महिन्याला पोलीसपाटलांची नियमित बैठक होत होती. कायदा-सुव्यवस्था, शासनाच्या योजना, जनतेतील प्रतिक्रिया आदि माहितींची देवाण-घेवाण करून प्रशिक्षण शिबिर घेतले जात होते. पूर्वी पोलीसपाटलांचे मानधन त्या-त्या पोलीस ठाण्याच्या मार्फत शासनाकडून दिले जात असत. मात्र गेल्या काही वर्षापासून शासनाकडून पगार-मानधन हे बॅँकेत खात्यावर जमा होऊ लागल्याने पोलीस ठाणे व पोलीस पाटील यांच्यातील अंतर वाढले. बैठका व इतर सर्व गोष्टी बंद पडल्याने पोलीस, जिल्हा प्रशासन व पोलीसपाटील यांच्यातील दरी वाढत चालली आहे. अवकाळी पावसाचे पंचनामे करताना तलाठी, सर्कल अधिकारी परस्पर गेले त्यांनी पोलीस पाटलांना सांगितले अथवा विचारले सुद्धा नाही. चोरटया गौण खनिजाबाबत पोलीस पाटलांनी पोलीस तसेच जिल्हा प्रशासनाला माहिती देऊनही दुर्लक्ष केले जाते असाही पोलीसपाटील संघटनेचा आरोप आहे. (प्रतिनिधी)