मालेगावी प्रभाग दहामधील रस्त्यांच्या कामांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:15 IST2021-05-07T04:15:07+5:302021-05-07T04:15:07+5:30

दाभाडी दोलती शाळा ते मातोश्री मंगल कार्यालय (शिवरस्ता) रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, रस्त्यावरील दाभाडी शिवरस्ता ...

Demand for road works in Malegaon ward ten | मालेगावी प्रभाग दहामधील रस्त्यांच्या कामांची मागणी

मालेगावी प्रभाग दहामधील रस्त्यांच्या कामांची मागणी

दाभाडी दोलती शाळा ते मातोश्री मंगल कार्यालय (शिवरस्ता) रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात यावे, रस्त्यावरील दाभाडी शिवरस्ता अतिक्रमण काढण्यात यावे. मातोश्री मंगल कार्यालय ते दाभाडी शिवरस्ता मनपा हद्दीपर्यंत शिवरस्ता खडीकरण व डांबद्करण करणे. सूर्यवंशी लॉन्स ते अजितनगरपर्यंत शिवरस्ता डांबरीकरण व रुंदीकरण करणे, कृषीनगर ते भावसाहेब निकम शॉपिंग सेंटरपर्यंत डांबरीकरण व रुंदीकरण करणे, भावसाहेब निकम शॉपिंग जलधारा कॉलनीपर्यंत डांबरीकरण करणे, बेनेवाल कॉर्नर ते गणेशनगर अंतर्गत रस्ता मंजूर असताना सदर काम बंद आहे हे काम ताबडतोब सुरू करण्यात यावे, संभाजी कॉलनी ते एकनाथनगरपर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूस भुयारी गटार करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Demand for road works in Malegaon ward ten