शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

देवळा नगरपंचायतीसाठी प्रभागरचना जाहीर

By admin | Updated: September 26, 2015 21:51 IST

हिरमोड : प्रारूप याद्या तयार झाल्यानंतर ३०१ तक्रारी

देवळा : नूतन देवळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी १७ प्रभागांची रचना करण्यात आली असून, प्रभागरचनेत मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला आहे. मतदार याद्यांवर ३०१ हरकती आल्या असल्याचे समजते.सहा महिन्यांपूर्वी देवळा ग्रामपालिका विसर्जित करण्यात येऊन देवळा नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली होती. देवळ्याच्या तहसीलदार श्रीमती शर्मिला भोसले यांची नगरपंचायतीच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. नगरपंचायत निर्मितीनंतर सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले होते. यापूर्वी देवळा ग्रामपालिकेत सहा वॉर्ड होते. यापैकी पाच वॉर्डात प्रत्येकी तीन व एका वॉर्डात दोन असे एकूण १७ ग्रामपालिका सदस्यसंख्या होती. नगरपंचायत निर्मितीनंतर वॉर्डरचना बदलण्यात येऊन १७ प्रभागांची स्वतंत्र रचना करण्यात आली. १७ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ९ जागा महिलांसाठी राखीव आहेत. १७ जागांचे आरक्षण पुढीलप्रमाणे - इतर मागासवर्गीय महिला राखीव-३, इतर मागावर्ग पुरुष-२, सर्वसाधारण महिला राखीव-४, सर्वसाधारण पुरुष-४, अनु.जाती पुरुष-१, अनु.जाती स्त्री राखीव-१, अनु. जमाती पुरुष-१, अनु.जमाती स्त्री राखीव-१.आपापल्या पक्षाचे चिन्ह घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका उमेदवार लढतात. त्याठिकाणी नेहमी युत्या असतानाही स्वतंत्र निवडणुका लढविल्या जातात. त्यामागचे पक्षाचे धोरण असे असते की, पक्षाची निशाणी प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी या हेतूनेच स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका स्वबळावर लढविल्या जातात. तोच हेतू डोळ्यासमोर ठेवून आघाडी शासनाने तालुकास्तरावर असलेल्या ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला. देवळा ग्रामपालिकेत स्थानिक पातळीवर नेत्यांची युती सर्वश्रुत होती. ग्रामपालिका असल्याने ही युती होत होती. परंतु आता देवळा ग्रामपालिकेला नगरपंचायतीचा दर्जा दिल्याने होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्वच पक्ष उडी मारणार असून, चौरंगी लढत होऊ शकते. (वार्ताहर)