शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोडला भक्तिभावात निरोप

By admin | Updated: September 28, 2015 22:45 IST

नाशिकरोडला भक्तिभावात निरोप

नाशिकरोड : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात, गुलालाची उधळण करत बालगोपाळांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला मोठ्या भक्तिभावाने निरोप दिला.गेल्या ११ दिवसांपासून घराघरांत व सोसायटी-कॉलनी, सार्वजनिक ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या लाडक्या श्री गणरायाला निरोप देण्यासाठी रविवारी सकाळपासूनच सर्वत्र लगबग दिसत होती. देवळालीगाव वालदेवी नदीपात्रात दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी असल्यामुळे श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. मनपाने मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी नियोजन केले होते. मात्र वालदेवी नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.देवळालीगाव, विहितगाव, वडनेर वालदेवी नदीतीरावर जेलरोड दसक गोदावरी नदी, चेहेडी दारणा नदी, आगरटाकळी आदि ठिकाणी भाविक व मंडळांनी सकाळपासून लाडक्या श्री गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती. मनपाने देवळालीगाव, जेलरोड, दसक, वडनेर, विहितगाव, मनपा शाळा १२५, जेलरोड नारायणबापू चौक, शिखरेवाडी, जेतवननगर, चेहेडी या नऊ ठिकाणी मूर्तींचे दान व निर्माल्य संकलित करण्यासाठी केंद्र उभारले होते. जलप्रदूषण टाळण्यासाठी बहुसंख्य भाविक, मंडळांनी आपल्या मूर्ती मनपाच्या मूर्ती दान केंद्रावर जमा करण्यासाठी गर्दी केली होती.एकमेव मिरवणूकनाशिकरोडची मुख्य श्री गणपती विसर्जनाची मिरवणूक कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे. दुष्काळजन्य परिस्थिती, सिंहस्थ कुंभमेळा व आर्थिक मंदी यामुळे अनेक सार्वजनिक मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला. त्यामुळे सार्वजनिक लहान-मोठ्या मंडळांनी आपापल्या भागातून वाजत-गाजत मिरवणूक काढून लाडक्या श्री गणरायाचे विसर्जन केले. तर मुख्य मिरवणुकीत नाशिकरोड-देवळाली व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाचा एकमेव चित्ररथ निघाला होता. त्या चित्ररथापुढील आदिवासी नृत्य आकर्षण ठरले होते.जेलरोडला गर्दीगेल्या काही वर्षांपासून जेलरोड दसक गोदावरी नदीपात्रात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात मोठी गर्दी होत असते. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त प्रशस्त घाट बनविण्यात आल्याने भाविकांना श्री गणरायाचे विसर्जन करताना मोठी सुविधा निर्माण झाली होती. सकाळपासून दुपारपर्यंत दसक घाटावर थोड्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गणरायाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे गणरायाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. तर देवळालीगाव वालदेवी पात्रात खराब पाणी असल्याने अनेक भाविकांनी रोकडोबावाडी-विहितगाव श्री अण्णा चतुर्मुख गणपती मंदिराजवळ कोल्हापूर टाईप बंधारा परिसरात श्री गणरायाचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केली होती. चेहेडी, विहितगाव, वडनेर, आगर टाकळी, तपोवन आदि भागातदेखील श्री गणरायाचे विसर्जन मोठ्या भक्तिभावात करण्यात आले. (प्रतिनिधी)