मुकणेच्या इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

By Admin | Updated: April 13, 2015 01:00 IST2015-04-13T01:00:03+5:302015-04-13T01:00:39+5:30

मुकणेच्या इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

Death of snake rat | मुकणेच्या इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

मुकणेच्या इसमाचा सर्पदंशाने मृत्यू

  नाशिक : शेतात काम करीत असताना सर्पदंश झालेल्या इसमाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ मृत इसमाचे नाव अशोक दत्तू आवारे (वय ५०, रा़ मुकणे, ता़ इगतपुरी) असे आहे़ शनिवारी (दि़११) रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतातून जात असताना त्यांच्या डाव्या पायास सर्पदंश झाला़ त्यांना मुलगा प्रकाश आवारे याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते़ उपचारादरम्यान रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ़ राहुल पाटील यांनी घोषित केले़ या प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Death of snake rat