शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

क्षणाक्षणाला वाढतेय मरण, स्मशानात पुरेना सरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 01:30 IST

शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अमरधाममध्ये देखील ताण वाढू लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत आणि गॅसदाहिनी उपलब्ध असल्या तरी सर्वच ठिकाणी त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपरिक बेडवरच लाकूड फाट्याचा उपयोग करून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत सरासरी ३४४ टन लाकूड फाटा अंत्यसंस्कारासाठी लागला आहे. मात्र, एप्रिल महिन्यात अगदी पंधरा दिवसांतच ६१२ टन लाकूड अंत्यविधीसाठी लागले आहे. 

ठळक मुद्देदुर्दैवी अवस्था : तीन महिन्यांत सरासरी ३४४ टन, तर एप्रिलमध्ये उच्चांकी ६१२ टन लाकडाचा वापर

नाशिक : शहरात कोरोना बळींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अमरधाममध्ये देखील ताण वाढू लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्युत आणि गॅसदाहिनी उपलब्ध असल्या तरी सर्वच ठिकाणी त्या उपलब्ध नाहीत. त्यामुळे पारंपरिक बेडवरच लाकूड फाट्याचा उपयोग करून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. गेल्या जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत सरासरी ३४४ टन लाकूड फाटा अंत्यसंस्कारासाठी लागला आहे. मात्र, एप्रिल महिन्यात अगदी पंधरा दिवसांतच ६१२ टन लाकूड अंत्यविधीसाठी लागले आहे. नाशिक शहर विभागात सुमारे ११ स्मशानभूमी आहेत. त्यातील हिंदू स्मशानभूमीत मोफत अंत्यसंस्कार योजनेअंतर्गत सहा ते आठ मण लाकूड, रॉकेल, गेावऱ्या मोफत दिले जाते. गेल्या वर्षी कोरोनाचे संकट आल्यानंतर सुरुवातीला या आजारामुळे मृत्यू झालेल्यांवर विद्युत आणि गॅस शव दाहिनीमध्येच अंत्यसंस्कार केले जात होते. परंतु तीन तीन दिवसांचे वेटिंग सुरू झाल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनी पारंपरिकक बेडचा देखील अंत्यसंस्कारासाठी वापर सुरू केला आहे. त्यानंतर आता कोरोना बाधितांच्या अंत्यसंस्काराला पूर्वीप्रमाणेच साहित्य दिले जात आहे. सध्या तर एप्रिल महिन्यात कोरोनाचा कहर जाणवत आहे. अंत्यसंस्कारासाठी रांगा लागत असून लाकूड फाट्याचा वापर अधिक होत आहे. मृतांची वाढती आकडेवारी शहरवासियांचे मन हेलावणारी ठरत आहे.तीन महिन्यांचा असा आहे आढावा...गेल्या तीन महिन्यांचा आढावा घेतला तर पंचवटीत अमरधाममध्ये जानेवारीत ७०, फेब्रुवारीत ७९० तर मार्च मध्ये २०० टन लाकूड लागले तर १५ एप्रिलपर्यंत १५० टन लाकडाचा वापर झाला आहे. नाशिकरोड मध्ये जानेवारीत ३०, फेब्रुवारीत ३९ तर मार्च महिन्यात ७० आणि १५ एप्रिलपर्यंत १३० टन लाकडाचा वापर झाला आहे. नाशिक पूर्व विभागात जानेवारीत ९३, फेब्रुवारीत ९२, मार्च महिन्यात दीडशे  तर १५ एप्रिलपर्यंत १६७ टन लाकूड फाट्याचा वापर झाला आहे. सिडको विभागात जानेवारीत ४३, फेब्रुवारीत ४७, मार्च महिन्यात ६० तर १५ एप्रिलपर्यंत १२० टन लाकूड वापरले. सातपूर विभागात जानेवारीत १८ टन, फेब्रुवारीत २१, मार्च महिन्यात ३० तर १५ एप्रिलपर्यंत ४५ टन लाकूड वापरले गेले आहे.   

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाDeathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या