शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
4
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
5
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
6
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
7
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
8
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
9
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
10
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
11
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
12
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
13
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
14
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
15
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
16
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
17
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
18
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
19
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
20
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

चाकीस्वाराचा ताबा सुटल्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 18:48 IST

नाशिक : सारडा सर्कलवरून भरधाव दुचाकी चालवित द्वारकेच्या दिशेने मार्गस्थ होताना रस्त्यात भटके श्वान पळाल्याने दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने वाहन ...

ठळक मुद्देएक कुत्रा त्यांच्या वाटेत पुढे आल्याने त्यांचा दुचाकीचा ताबा सुटला

नाशिक : सारडा सर्कलवरून भरधाव दुचाकी चालवित द्वारकेच्या दिशेने मार्गस्थ होताना रस्त्यात भटके श्वान पळाल्याने दुचाकीस्वाराचा ताबा सुटल्याने वाहन घसरु न अपघात झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. श्याम चंद्रकांत इंगळे(२९, रा. केळेगाव, ता.सिल्लोड) याचा मृत्यू झाला. इंगळे हे त्यांच्या बजाज डिस्कव्हर दुचाकीने (एम एच १५ एच ए ८६३१) भरधाव जात होते. संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सारडा सर्कल येथे एक कुत्रा त्यांच्या वाटेत पुढे आल्याने त्यांचा दुचाकीचा ताबा सुटला आणि दुचाकी घसरली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.विनयनगरला बंगला फोडून ७७ हजाराचा ऐवज लंपासनाशिक : मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत विनयनगर येथे एका बंद बंगल्याचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यानी सुमारे ७७ हजाराचा ऐवज लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी चोरट्याविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी हेमंत शंकरराव जोशी (४८) यांच्या सासऱ्यांचा बंद बंगला अज्ञात चोरट्यांनी १० ते १२ तारखेच्या दरम्यान फोडला. चोरट्यांनी घरातून ३० हजाराचा सोन्याचा नेकलेस, १५ हजाराचे सोन्याचे मोहनमाळ, ७ हजाराचे कानातले सोन्याचे टॉप्स, ५ हजाराचा एलजीचा फ्रीज, ३ हजारांचा जुना टीव्ही, मिक्सर, टेबल फॅन, पंचपात्री, जर्मनचे सहा डब्बे, २ सिलिंडरच्या टाक्या, १० हजरांचा म्युझीक पियानो असा एकूण ७७ हजार ५०९ रु पयांचा ऐवज चोरट्याने लुटून पोबारा केल्याचे जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.चोरट्यानी मुख्य प्रवेशद्वारावर असलेले लोखंडी ग्रील कापून बंगल्याच्या आत प्रवेश करत बेडरूममध्ये कपाटात ठेवलेलं दागिने स्वयंपाक घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास केल्या आहेत याप्रकरणी पोलिसांनी जबरी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हे करीत आहेत.शहरातवेगवेगळ्या भागात तिघांची आत्महत्यानाशिक : पेठरोड येथील जुईनगर परिसरातील रिहवासी दीपक शंकर पाथरे (२७) याने विष प्राशन केल्याने त्याचा मृत्यू झाला. शनिवारी (दि.१२) हा प्रकार उघडकीस आला. दीपकने राहत्या घरात विष सेवन केले, त्यास जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरु ळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दुसर्या घटनेत दत्तमंदिर येथील रिहवासी अभिषेक सोमनाथ वाडेकर (२८) या युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. शनिवारी (दि.१२) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अभिषेकने गळफास घेतल्याचे आढळून आल्याने त्यास हर्षद वाडेकर याने जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.तीसºया घटनेत गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत घडलीयेथील एका मंदिराजवळ एका वृद्धाने उडी घेत आपले जीवन संपविले. गोदापात्रात देविदास शंकर बागुल (७५, रा. रामेश्वर नगर) यांनी उडी मारु न आत्महत्या केली. बागुल यांनी जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी लिहून घराबाहेर पडले होते, असे पोलिसांनी सांगितले. शनिवारी (दि.११) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस