शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी माध्यमिक शाळांमध्ये रचनावादाचे मरण : रमेश पानसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 01:11 IST

राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून, येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे.

ठळक मुद्देनाईक पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमात केली टीका

क्रांतिवीर वसंतराव नाईक पुण्यतिथीनिमित्त बोलताना रमेश पानसे. व्यासपीठावर पंढरीनाथ थोरे, अ‍ॅड. अशोक आव्हाड, पंडितराव येलमामे, कमलेश बोडके, तानाजी जायभावे, सुरेश घुगे. अ‍ॅड. पी. आर. गिते, नरेंद्र दराडे, दिगंबर गिते आदी.नाशिक : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि निर्णयक्षमता निर्माण करणारे रचनावादी शिक्षण दिले जात असले तरी माध्यमिक शिक्षण देणाऱ्या बहुतांश शाळा खासगी संस्थांच्या असून, येथे रचनावाद मारला जात असल्याची खंत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी केले आहे. शालेय शिक्षण समाधानकारक करण्यासाठी रचनावाद शिक्षण पद्धती एकमेव उपाय असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेतर्फे क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त ते बोलत होते. नाईक संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार नरेंद्र दराडे, नगरसेवक कमलेश बोडके, पुष्पा आव्हाड, पंडित येलमामे, पां. भा. करंजकर, संस्थेचे उपाध्यक्ष पी. आर. गिते, योगाचार्य प्रज्ञा पाटील आदी उपस्थित होते. पानसे म्हणाले, जगातील सर्वात तरुण असलेल्या भारतात तरुणांना योग्य शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी असल्याचे अधोरेखित करताना मुलांना इंग्रजीऐवजी मराठी माध्यमातूनच शिक्षण देण्याचे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारने २०१४ पासून रचनावादी शिक्षणासाठी पुढाकार घेतला असून, त्यानुसार आराखडाही तयार करण्यात आला आहे. परंतु, २००९ मध्ये आलेल्या शिक्षण हक्क कायद्यातही रचनावादी शिक्षण पद्धती अस्तिवात आणण्याचा प्रयत्न केला गेला असतानाही प्रत्यक्षात मात्र दहा वर्ष होऊनही ही पद्धती वर्गात अंमलात आणली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, विद्यार्थीदशेतील विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग याविषयी विविध प्रसंगांच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या कार्याला उजाळा दिला.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण