शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दादा भुसे यांचा मालेगावी जुगार अड्ड्यावर छापा

By admin | Updated: January 23, 2016 23:47 IST

दादा भुसे यांचा मालेगावी जुगार अड्ड्यावर छापा

मालेगाव : तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाळीसगाव चौफुली भागात मटक्याच्या अड्ड्यावर आणि पत्त्याच्या क्लबवर सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी छापा घालून रोख रकमेसह साहित्य जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोन जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सहकार राज्यमंत्री भुसे यांनीच या संदर्भात माहिती दिली. गेल्या महिनाभरापासून या भागात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुखांनादेखील कारवाईचे साकडे घातले होते. मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी स्वत:च या विरोधात आवाज उठवत मटक्याच्या अड्ड्यावर छापा घातला. याठिकाणी रोख रकमेसह मटक्याचे साहित्य ताब्यात घेतले. सालीम अहमद साहेबखान व राजेश मांगूलाल मोरे यांना त्यांनी पकडून पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या ताब्यात दिले. यानंतर त्यांनी राजमाने रस्त्यावर असलेल्या पत्त्याच्या क्लबवर छापा टाकला. मात्र येथील संशयित फरार झाले होते. येथील जुगाराचे साहित्य जप्त करून मोसमपूल येथे आणण्यात आले. तेथे रात्री उशिरापर्यंत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. छापा टाकण्यापूर्वी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना मोबाइल संदेशाद्वारे आणि प्रत्यक्ष बोलून या बाबतची माहिती दिल्याचे राज्यमंत्री भुसे यांनी सांगितले. या प्रकाराचे चित्रकरण करण्यात आले असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.