लोकसाहित्यात संत रचनांचे मोलाचे योगदान

By Admin | Updated: September 26, 2016 02:03 IST2016-09-26T02:03:16+5:302016-09-26T02:03:49+5:30

उमप यांनी उलगडला साहित्याचा आविष्कार

Contribution of Saint compositions in folk literature | लोकसाहित्यात संत रचनांचे मोलाचे योगदान

लोकसाहित्यात संत रचनांचे मोलाचे योगदान

नाशिक : संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आदि संतांनी रचलेले अभंग, काव्य आणि भारूड यांचे आजच्या लोकसाहित्यात मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन शाहीर नंदेश उमप यांनी के ले. रावसाहेब सभागृहात महाराष्ट्र प्रदेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रतिभा संगम संमेलनात ‘साहित्यिकांचा आविष्कार’ विषयावर ते बोलत होते. उमप म्हणाले, अलाउद्दीन खिलजीच्या आक्रमनानंतर येथील सांस्कृतिक साहित्याचा राजाश्रय धोक्यात आला. मात्र याच काळात संतांनी त्यांच्या अभंग, काव्य, भारुडांच्या माध्यमातून सांस्कृ तिक साहित्याची नितीमूल्यांचे पुनरुज्जीवन करीत साहित्य क्षेत्रात मोलाची भर घातली. संत साहित्य ते लोक संगीत आणि लोक कलेचा प्रवास उलगडून सांगताना फु बाई फू.. फुगडी फू, विंचू चावला आदि भारुड लोकगीतांचे सादरीकरण केले. उमप यांनी पठ्ठे बापूराव आणि भाऊ फक्कड यांच्यातील रंगलेल्या सामन्याचेही वर्णन रंगवताना त्यांनी गण, गौळण, वग यांतील विविध पदांचे गायन करून लावणी व तमाशाचा पेशवाईपासून झालेला प्रवास उलगडून सांगितला. (प्रतिनिधी)

Web Title: Contribution of Saint compositions in folk literature