शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घाटनदेवी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम

By admin | Updated: October 12, 2015 22:59 IST

इगतपुरी : विविध संस्थांचा सहभाग

इगतपुरी : शहरातील श्री स्वामी समर्थ मंडळ, जनसेवा प्रतिष्ठान व डॉ. हेडगेवार पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पाऊले वळती स्वच्छतेकडे’ या उपक्रमांतर्गत तालुक्याचे श्रद्धास्थान असलेल्या घाटनदेवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी विविध सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालयांतील ३३० विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.इगतपुरी तालुक्याचे ग्रामदैवत व नाशिक जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या घाटनदेवी मंदिरात दरवर्षी नवरात्रात मोठी यात्रा भरते. देवीच्या दर्शनकरिता नाशिक जिल्ह्यासह ठाणे, नगर, मुंबईहून भाविक येतात. यात्रेपूर्वी मंदिर परिसराची स्वच्छता केली तर घाटनदेवी परिसर अधिक खुलून दिसेल आणि येणाऱ्या भविकांनाही प्रसन्न वाटेल हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्र म राबविण्यात आला. स्वच्छता मोहिमेत महात्मा गांधी शाळेच्या ११००, केपीजी महाविद्यालयाच्या ८०, पंचवटी शाळेच्या ५०, वंडरलॅण्ड शाळेच्या १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसह घाटनदेवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांनी स्वच्छता केली.सकाळी तीन तास चाललेल्या स्वच्छता मोहिमेमुळे मंदिर परिसर लख्ख झाला. मोहिमेचे उद्घाटन आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या कार्यक्र मात नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, महिंद्रा कंपनीचे अधिकारी कैलास ढोकणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे आर. जी. परदेशी, वंडरलॅण्ड शाळेचे प्राचार्य अल्थिया परेरा, पंचवटी शाळेचे प्राचार्य प्रसाद जॉन यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले.स्वच्छता मोहिमेत घाटनदेवी माता मंदिर ट्रस्ट, इगतपुरी नगर परिषद, राष्ट्रीय हरित सेना, महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनी, अखिल भारतीय ब्राह्मण संघ, असीमा चॅरिटेबल ट्रस्ट, भारतीय जैन संघटना, शीतलामाता मित्रमंडळ, इच्छामणी गणेश मंडळ, आदर्श सोशल ग्रुप या सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला.(वार्ताहर)