मालेगावी संत गाडगे महाराज प्रतिष्ठानतर्फे बसस्थानकाची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:15 IST2021-02-24T04:15:13+5:302021-02-24T04:15:13+5:30

लोणवाडेचे नवनिर्वाचित सरपंच रवींद्र पवार, लाड शाखीय युवक मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर तारे, विजय भावसार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ...

Cleaning of bus stand by Malegaon Sant Gadge Maharaj Pratishthan | मालेगावी संत गाडगे महाराज प्रतिष्ठानतर्फे बसस्थानकाची स्वच्छता

मालेगावी संत गाडगे महाराज प्रतिष्ठानतर्फे बसस्थानकाची स्वच्छता

लोणवाडेचे नवनिर्वाचित सरपंच रवींद्र पवार, लाड शाखीय युवक मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर तारे, विजय भावसार यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कार्यकर्त्यांना सॅनिटायझर, मास्क वाटपही करण्यात आले. याप्रसंगी स्वच्छता मोहिमेत राजेंद्र भामरे, मयूर वांद्रे, संजय मिटकरी, विवेक पाटील, दर्शन पाटील, अभय शर्मा, जिभाऊ अहिरे, संजय पवार, विकास म्हसदे, सुरेंद्र टिपरे, रविराज सोनार, संजय पांडे, प्रकाश पानपाटील, भूषण सोनवणे, समाधान बंदरे, निशांत मानकर, संजय कोर, विवेक वैष्णव, नाना अहिरे, स्वप्नील वाघ, गिरीश वखारे, विश्वजित देव, सचिन खैरनार, प्रमोद सोनजे, हेमंत कोतकर यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमास बसस्थानकाचे निरीक्षक निवृत्ती उशिरे, कामगार नेते अनिल देशमुख उपस्थित होते. मनपाचे उमेश सोनवणे रवींद्र अहिरे व सहकारी महिला कामगारांनी मदत केली. जगदीश वैष्णव यांनी प्रास्तविक केले. रमेश उचित यांनी सूत्रसंचालन तर आभार अतुल महाले यांनी मानले.

Web Title: Cleaning of bus stand by Malegaon Sant Gadge Maharaj Pratishthan