शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
पोसाईडन, सरमत आणि... पुतीन यांचे सुपरवेपन्स, रशिया गोळा करतोय विध्वंसाची सामुग्री, कारण काय?  
3
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
4
मामाला भेटायला आलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात अत्याचार; आरोपी अटकेत
5
NEET पेपरफुटीचा खरा मास्टरमाईंड कोण? CBI नं कोर्टात मांडले नवे पुरावे, विद्यार्थ्यांसह पालकही शॉक!
6
Video - नियतीचा खेळ! फाटके कपडे, विस्कटलेले केस; चित्रपटात काम करणारी 'ती' रस्त्यावर मागतेय भीक
7
जेट, ५० हजार डॉलरचा सूट आणि गर्लफ्रेंडसोबत..., FBI चे डायरेक्टर काश पटेल वादाच्या भोवऱ्यात  
8
मंदिरात दर्शनानंतर पायऱ्यांवर बसणे शुभ की अशुभ? अनेकांना माहीत नाही यामागचं खरं रहस्य; जाणून घ्या
9
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
10
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
11
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
12
Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
13
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
14
Nashik: घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
15
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
16
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
17
Raid: सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
18
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
19
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
20
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाचे संचलन

By admin | Updated: October 13, 2016 01:26 IST

नाशिकरोड : तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी; पवन पवारसह चौघांवर गुन्हा

नाशिकरोड : परिसरात गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सशस्त्र संचलन सुरू केले आहे. जमावबंदी आदेश असतानाही नगरसेवक पवन पवार व त्याचे साथीदारांनी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, जेलरोड येथे दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. घटनेनंतर जेलरोड परिसरातील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली. त्यामुळे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
बुधवारी सकाळी शहरातून पोलिसांचा मोठा फौजफाटा संचलन करीत उपनगर चौफुलीवर दुपारी एक वाजेच्या सुमारास आला. पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, सचिन गोरे, मोहन ठाकुर, बजबळे, शालीग्राम पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, संजय देशमुख, नारायण न्याहळदे, देवराज बोरस्ते, हनुमंत गाडे आदिंसह सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, राइट कन्ट्रोल फोर्स, राज्य राखीव दलाच्या तुकड्या, कमांडो पथक, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस असा मोठा फौजफाटा कॅनॉलरोडने वाहनांमधून संचलन करत जेलरोड देशमुख भवन पर्यंत आला. तेथून पोलिसांचे संचलन जेलरोड शिवाजी पुतळा, राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या दिशेने निघाले.
पोलिसांची सतर्कता
राजराजेश्वरीकडून पोलिसांचे संचलन मॉडेल कॉलनी रस्त्यावरून शिवाजीनगरमध्ये आले. यावेळी नगरसेवक पवन पवार यांच्या कार्यालयाशेजारी काही कार्यकर्ते बसलेले होते. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी शहरात जमावबंदी आदेश लागू असल्याने निघून जाण्याबाबत सांगितले असता त्यावरून वाद निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांकडून प्रतिकार सुरू झाल्याने पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारमध्ये नगरसेवक पवन पवारसह त्याचा भाऊ विशाल व इतर साथीदारही सुटले नाही. लाठीमारमध्ये जखमी झालेल्या पवार बंधूंवर बिटको रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.
पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खाकीचा हिसका दाखविण्यास सुरुवात केल्याने काही मिनीटांतच जेलरोड परिसरातील दुकाने बंद होऊन अघोषित संचारबंदीसारखी परिस्थिती निर्माण झाली. शिवाजीनगर येथून पोलिसांचे संचलन जेलरोड, मध्यवर्ती कारागृहासमोरून भीमनगर, ब्रम्हगिरी सोसायटी, बेला डिसुझा रोडवरून के.एन. केला शाळा चौफुलीवर आले. यावेळी पोलिसांनी काही जणांना लाठ्यांचा प्रसाद देत पिटाळून लावले. यावेळी युवक व महिलांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करण्यास सुरूवात केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी जमावाची समजूत काढल्यानंतर जमाव पांगला. त्यानंतर पोलिसांनी देवळालीगांव राजवाडा येथेही संचलन केले. राजवाड्यातून पोलिसांनी विहितगाव बागुलनगरपर्यंत संचलन केले. (प्रतिनिधी)