छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:26 IST2018-05-15T01:26:19+5:302018-05-15T01:26:19+5:30

शिवसेनेच्या वतीने धर्र्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जुन्या नाशकातील संभाजी चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti excited | छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात

छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात

नाशिक : शिवसेनेच्या वतीने धर्र्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त जुन्या नाशकातील संभाजी चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, माजी महापौर विनायक पांडे, शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, शिवसेना विभाग प्रमुख उमेश चव्हाण, सचिन बांडे, सुनील जाधव, अमोल सूर्यवंशी, पप्पू टिळे, नाना काळे, संजय परदेशी, गजूभाऊ घोडके, मनिष खेले, अजय चौघुले, संजय भांगरे, नितीन कोळपकर, संदीप लबडे, गोकुळ मते, नीलेश इंगळे, अंकुश राऊत, कमलेश परदेशी, शिवा चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते. 
मराठा मंच संस्था
मराठा मंच नाशिक या संस्थेतर्फे छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. महापौर रंजना भानसी व नगरसेवक अरुण पवार यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पाहार घालून मानवंदना देण्यात आली.  याप्रसंगी महापौर रंजना भानसी यांनी सांगितले की, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याचा धगधगणारा अग्निकुंड होता. यावेळी अरुण पवार आणि मराठा मंचचे अध्यक्ष बापूसाहेब चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाप्रसंगी मराठा मंचचे सुनील निरगुडे, नीलेश पवार, विजय पाटील, राज भामरे, रामचंद्र घडवजे, प्रदीप पवार, अशोक महाजन, गजानन लकडे, पंडितराव मेंगाळ पाटील, सुनील पाटील, अनिल पवार, अ‍ॅड. कैचे, विष्णूू चव्हाण, रोहिणी दळवी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title:  Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti excited

टॅग्स :Nashikनाशिक